आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपाल यादवची सुटका अन् संजय दत्तचा ‘प्रस्थानम्’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजपाल यादव तिहार तुरुंगात तीन वर्षे शिक्षा भोगून परतले आहेत. त्यांनी महाजन यांच्याकडून कर्ज घेतले होते आणि त्यांनी दिलेला धनादेश बँकेत वटलेला नव्हता. चित्रपटसृष्टीत यश संपादन केल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंसाठी उत्तर प्रदेशात आश्रम बांधण्यासाठी हे कर्ज घेतल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. गुरूंच्या कृपेनेच यश मिळाले, असा त्यांचा विश्वास आहे. जेव्हा कुणी आपल्या यशाचे श्रेय भाग्याला देतो तेव्हा तो अडचणीत सापडतो.  यात त्याचा आत्मविश्वास घटतो. एका मराठी चित्रपटात एका मध्यमवर्गीय महिलेला भेटायला तिची मैत्रीण येते. तिचा पती व मुलगा मनमानी करीत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे ती सांगते. तेव्हा तिची मैत्रीण तिला एक ताईत देत तो दंडावर बांधण्याचा सल्ला देत, परिस्थिती सुधारेल, असे सांगते.  तिच्या पतीला एका भाड्याच्या दुकानात प्रिंटिंग मशीन चालवायची असते, पण ती घरातीलच एक खोली रिकामी करून त्यातच ही मशीन लावते. तसेच मुलाला विज्ञान शाखा सोडून वाणिज्य शाखेत जायला सांगते. या ताईतामुळे तिच्यात एक प्रकारचे धाडस येते व तिचे म्हणणे सर्वजण ऐकू लागतात. काही दिवसांनी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. परंतु नंतर तिची मैत्रीण सांगते की हा ताईत मंतरलेला नसून साधा होता व केवळ आत्मविश्वास वाढावा म्हणून तिला दिला होता. या चित्रपटाचे नाव ‘आत्मविश्वास’ होते. प्रारंभिक यशानंतर राजपाल अति आत्मविश्वासात गेले. संजय दत्तनेही तुरुंगवास भोगला आहे. परंतु वडिलांचा जनसंपर्क आणि राजकीय नेत्यांमुळे त्याची शिक्षा कमी झाली. संजय दत्तला मादक पदार्थांचे व्यसन असून त्यावर अमेरिकेत  इलाज करण्यात आला होता. त्याने दिग्दर्शित केलेला ‘प्रस्थानम’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सलमान खाननेही तुरुंगाची हवा खाल्ली आहे व उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले आहे.  अमेरिकेतही एका खेळाडूवर गंभीर आरोप होते. पण न्यायालयातून सुटला तरी जनतेच्या नजरेत तो दोषीच होता. हा जेव्हा घरी गेला तेव्हा तेथील नोकरांनी काम सोडल्याचे त्याला दिसल्याने तो हॉटेलात जेवणासाठी गेला. पण तेथेही त्याला नाकारण्यात आले. थोडक्यात, न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जनतेने त्यांना नाकारले. नुकत्याच प्रदर्शित ‘सेक्शन ३७५’ मध्ये आरोपी सुटतो. सरकारी वकील व अशिलाचे वकील निकालानंतर भेटतात व न्याय देऊ न शकल्याचे कबूल करतात. प्रत्येक देशातील तुरुंग तेथील जनतेच्या स्वभावानुसार काम करते. ‘शाशैंक रिडम्पशन’ चित्रपटात एक आरोपी दुसऱ्या आरोपीस लुटीची रक्कम एके जागी लपवल्याचे सांगतो. आपल्या देशात त्या कैद्यांना सर्व सुविधा मिळतात, ज्यांच्या नातेवाइकांकडून जेलरला भरघोस पैसे दिले जातात. भ्रष्टाचाराने माखलेल्या देशातून जेल कसे लिप्त राहील? याव्यतिरिक्तही आपण न्यायदेवतेचा सन्मान करतो. सुभाष कपूरच्या ‘जॉली एलएलबी भाग दोन’ मध्ये न्यायाधीश आपल्या टेबलावरील रोपट्यास पाणी घालतात. थोडक्यात असे म्हणता येईल की न्यायव्यवस्थेच्या रक्षणाचे प्रयत्न सुरू आहेत. कोर्टात बघून घेऊ असे कोठेही झालेल्या भांडणात बोलले जाते.  काही दशकांपूर्वी अभिनेता बलराज साहनींना साम्यवादी विचारसरणीमुळे तुरुंगात जावे लागले होते. दिवसा चित्रीकरण व रात्री तुरुंगवास अशी त्यांना शिक्षा देण्यात यावी असा विनंती अर्ज होता. पण विषय असा आहे की, आता राजपाल यादवला पुन्हा संधी मिळेल का? तुरुंगवास झाला तरी सलमान व संजय दत्त अजूनही चित्रपटसृष्टीत आहेत. पण त्यांना काम मिळण्याच्या संधी कमी आहेत. कारण आपणही कपाळ बघून टिळा लावतो.