आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajpur Police Station TI Saifullah Siddiqi Died After Heart Attack In Hospital In Ambikapur Chhattisgarh

मॉर्निंग वॉकवरून परतले होते पोलिस अधिकारी, घरात येताच पत्नीला बोलता-बोलता जमिनीवर कोसळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबिकापूर(छत्तीसगड)- राजपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी सैफुल्लाह सिद्दीकी(37) यांचे शुक्रवारी अचानक हार्टअटॅकमुळे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ते मॉर्निंग वॉकवरून घरी परतले होते, तेव्हा घरात मुलगी खेळत होती आणि पत्नी किचनमध्ये काम करत होती. तेव्हा पत्नीला ते म्हणाले, छातीत दुखत आहे आणि हे बोलत असतानाच अचानक खाली कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना रूग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 


- सैफुल्लाह हे जशपूर जिल्ह्यातील सन्नामध्ये राहणारे होते. त्यांनी 2008 मध्ये परीक्षा पास होऊन एसआय या पदावर नोकरी करत होते.
- 6 महिन्यांपूर्वीच त्यांना प्रमोशन मिळाले होते. त्यानंतर ते राजपूर पोलिस ठाण्यात टीआय पदावर तैणात झाले होते.