आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajshree's 'You Turn' Will Be Based On After Marriage Experience Of Husband And Wife

राजश्रीच्या 'यू टर्न'मधून मिळणार संसाराचे 'धडे', सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदेची केमिस्त्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेट डेस्क- प्रेमातील चढउतार घेऊन राजश्री मराठीची 'यू टर्न' ही वेब सिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच 'यू टर्न'चा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सिरीजची निर्मिती नेहा बडजात्या यांनी केली असून दिग्दर्शन मयुरेश जोशी यांचे आहे.

 
ट्रेलरवरून ही वेब सिरीज लग्नानंतरच्या आंबट-गोड क्षणांवर आधारित आहे, याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. लग्न यशस्वी होण्यासाठी काय करावे, याचे सल्ले देणारे आदित्य आणि मुक्ता लग्नानंतर छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालताना दिसत आहेत. हेच वाद अखेर टोकाला जातात. एका नाजूक वळणावर आल्यानंतर आदित्य आणि मुक्ता काय निर्णय घेतात? 'यू टर्न' घेणार की त्यांचे मार्ग वेगळे होणार? याची उत्तरे मात्र ही वेब सिरीज पाहिल्यावरच आपल्याला मिळतील. 

बातम्या आणखी आहेत...