Home | National | Rajasthan | Rajsthan election Publicity rahul gandhi, narendra modi

पंतप्रधान मोदींच्या राजस्थानसह 5 राज्यांत 679 जागांसाठी 32 सभा

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Dec 07, 2018, 10:52 AM IST

- निवडणूक प्रचार 5 राज्यांत पीएम मोदींच्या सर्वाधिक 12 सभा राजस्थानात - भाजप-काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वाधिक वादग्रस्त

 • Rajsthan election Publicity rahul gandhi, narendra modi

  जयपूर - राजस्थानात २०० विधानसभा जागांसाठी शुक्रवारी (७ डिसेेंबर) मतदार होत आहे. भाजपने ५ निवडणूक राज्यांत सर्वात जास्त ताकद राजस्थानात लावली. या ठिकाणी त्यांनी सर्वाधिक वादग्रस्त वक्तव्ये केली. प्रचार सभेचे म्हणाल तर पंतप्रधान मोदी यांनी ५ निवडणूक राज्यांपैकी सर्वात जास्त १२ सभा राजस्थानात घेतल्या. एका सभेद्वारे त्यांनी राज्यातील २०० विधानसभा जागांपैकी सुमारे १६ ते १७ जागांवर प्रभाव टाकला.

  पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानात जवळपास उत्तर प्रदेशएवढ्या सभा घेतल्या. यूपीत त्यंानी ४०३ जागांसाठी २४ सभा घेतल्या होत्या. ज्या ५ राज्यांत मतदान होणार आहे, त्यात मोदी यांनी गुजरातपेक्षाही कमी सभा घेतल्या. पीएम मोदींनी ५ राज्यांत एकूण ३२ सभा घेतल्या. तिथे एकूण ६७९ जागा आहेत. त्यांनी गुजरातमधील १८२ जागांसाठी ३४ सभा घेतल्या होत्या. यात एका सभेतून ५-६ मतदारसंघांवर प्रभाव टाकला.

  - मोदींनी एमपी, छत्तीसगड व तेलंगणात एका सभेद्वारे २२ ते २४ जागांवर प्रभाव टाकला
  - मोदी यांनी मध्य प्रदेशच्या २३० जागांसाठी १० सभा घेतल्या. म्हणजे एका सभेद्वारे त्यांनी २३ जागांवर प्रभाव टाकला.
  - छत्तीसगडमध्ये त्यांनी ९० जागांसाठी ४ सभा घेतल्या. एका सभेतून २२ जागा कव्हर केल्या. िमझोरामच्या ४० जागांवर १ सभा.

  - कर्नाटकमध्ये मोदींनी २२४ जागांसाठी २१ सभा घेतल्या. बिहारमध्ये २४३ जागांसाठी त्यांनी ३१ सभा घेतल्या होत्या.
  - राहुल यांनी ५ राज्यांत ७७ सभा घेतल्या, राजस्थानात २०, एका सभेने १० जागांवर प्रभाव
  - राहुल यांनी राजस्थानात २० सभा घेतल्या, म्हणजे एका सभेतून १० जागांवर त्यांनी प्रभाव टाकला.
  - मध्य प्रदेशात राहुल यांनी २१ सभा व ५ रोड शो घेतले. म्हणजे एका सभेतून ११ जागा कव्हर. मिझोराममध्ये त्यांच्या २ सभा.
  - छत्तीसगडमध्ये राहुल यांनी ९० जागांसाठी २० सभा घेतल्या. राहुल यांनी तेलंगणात १४ व मिझोरामध्ये २ सभा घेतल्या.

  आदिवासींनी भाजप-काँग्रेसची झोप उडवली डुंगरपूर | गुजरातस्थित भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) राजस्थान विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा उतरली आहे. या पक्षाने दक्षिण राजस्थानमध्ये काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची झोप उडवली आहे. दक्षिण राजस्थानात आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. वागद भागात राहणाऱे लोक अद्याप पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आिदवासी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. मात्र, पाच वर्षांनी ते लोकप्रतिनिधी बदलण्याला प्राधान्य देत आहेत. बीटीपीने १७ उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यातील केवळ ११ जणांचे अर्ज छाननीत वैध ठरले. ११ उमेदवारांपैकी दोन उमेदवारांचे वय पस्तिशीच्या वर आहे.

  तेलंगणात घरासाठी ५ लाख देऊ : राहुल
  हैदराबाद | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेलंगणातील कोडदमध्ये सभा व हैदराबादेत पत्रपरिषद घेतली. कोडदमध्ये राहुल म्हणाले, राज्यात ४ हजारहून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३५ लाख बेरोजगार फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी केसीआरचा अर्थ 'खावा कमिशन राव' असा घेतला आहे. आज तेलंगणातील प्रत्येक कुटुंब कर्जात आहे. केसीआर यांचे मित्र मोदींनी श्रीमंतांचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे नाही. आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. प्रत्येक कुटुंबाला घर तयार करण्यासाठी ५ लाख रुपये देऊ.

Trending