• Home
  • News
  • Raju Hirani will returned in the direction field by web platform, maker approched him

Bollywood / वेब प्लॅटफॉर्मने डायरेक्शनमध्ये परतणार राजू हिरानी, मीटू प्रकरणात फसलेले असूनही मेकर्सने केले अप्रोच

एक-एक करून कामावर परतले मीटूमध्ये अडकलेले कलाकार 
 

दिव्य मराठी वेब

Jun 20,2019 01:36:05 PM IST


एंटरटेन्मेंट डेस्क : राजकुमार हिराणी सिने इंडस्ट्रीत सर्वात दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहेत. मात्र जानेवारीमध्ये त्यांचे नाव मीटू प्रकरणात आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मात्र राजूने आपल्यावरील सर्व अारोप फेटाळले होते. कारण या प्रकरणात आरोपी करणाऱ्या मुलीने कुठेच तक्रार दिली नव्हती, तिने पोलिसांना तक्रार दिली नाही आणि ती कोर्टातही गेली नाही.

आता राजूला दोन मोठे डिजिटल माध्यमं नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमने चित्रपट बनवण्याची आॅफर दिल्याचे ऐकले आहे. या माध्यमातून हिराणी इंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहेत. याबरोबरच ते मीटू प्रकरणात अडकलेले ५वे कलाकार असतील, जे कामावर परतले आहेत. राजूच्या विरोधात 'संजू'ची सहायक दिग्दर्शकाने मीटूचा आरोप लावला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइममध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. दोन्ही माध्यमं बॉलीवूडच्या टाॅप दिग्दर्शकाना साइन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या दोन्ही माध्यमांनी हिराणीला अॉफर िदली आहे. ते एका माध्यमांसाठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

दिग्दर्शन किंवा निर्मिती करू शकतात राजू...
राजूने सध्या तरी कोणताच निर्णय घेतला नाही. मात्र निर्मितीत वेबसाठी कंटेंट बनवण्याचा ते विचार करत आहेत. ते आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून नवीन स्क्रिप्ट आणि प्रतिभेला संधी देऊ इच्छित आहे. तर पाहू हिराणी डिजिटल माध्यमांसाठी चित्रपट बनवतात की निर्मिती करतात. राजू हिराणीने नुकतीच मेहुणा संजीव किशनचंदनी यांच्या माहितीपटाची निर्मिती केली होती.

- 04 अरोपी आतापर्यंत परतले कामावर.
- 01 चित्रपट बनवला हिराणी यांनी आरोप लावल्यानंतरही.
- 02 डिजिटल माध्यमांनी हिराणीला दिली चित्रपट बनवण्याची ऑफर.

हेदेखील परतले कामावर...
गेल्या वर्षी मीटू चळवळीत अनेक नावे अडकली होती त्यामुळे त्यांना आपल्या अनेक प्राेजेक्ट्समधून बाहेर पडावे लागले होते. मात्र आता त्याचा प्रभाव कमी दिसून येत आहे. अनेक असे आरोपी आता कामावर परतले आहेत. जाणून घेऊन त्यांच्याविषयी...

आलोक नाथ...
काय हाेते प्रकरण : आलोकवर वनिता नंदाने शूटिंगदरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे आणि बलात्काराचाही आरोप लावला होता. अभिनेत्री संध्या मृदुलनेदेखील आलोकवर अनेक आरोप लावले होते. तरीदेखील आलोकला काम मिळत गेले.
पुनरागमन : नुकताच त्यांचा 'दे दे प्यार दे' रिलीज झाला. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

नाना पाटेकर...
काय होते प्रकरण : बॉलीवूडमध्ये मीटू चळवळीची सुरुवात नानापासूनच झाली. नानावर तनुश्री दत्ताने लैंगिक शोषणाचा आरोप लावला. या प्रकरणात पोलिासांनी तपास केल्यानंतर कोणताच पुरावा मिळाला नसल्याने नानाला क्लीन चिट दिली.
पुनरागमन : नाना आपल्या हिट कॉमेडी फ्रेंचायझी 'वेलकम'च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.

विकास बहल ...
काय होते प्रकरण : 'क्वीन' बनवणाऱ्या विकास बहलवर त्याच्या जुन्या कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीने छळाचा आरोप लावला होता. नंतर मुलीने केस बंद करायला लावली. आता या प्रकरणात विकासला रिलायन्स एंटरटेन्मेंटने क्लीन चिट दिली.
पुनरागमन : विकासचे नाव त्याच्या 'सुपर 30'शी अधिकृतपणे जोडले आहे. निर्मात्यांनी त्यांना चित्रपटात दिग्दर्शकाचे स्थान दिले आहे.

मुकेश छाबडा...
काय होते प्रकरण : मुकेश छाबडावर अनेक महिलांनी मीटूअंतर्गत आरोप लावले. यानंतर त्याला 'किजी और मैनी'मधून काढून टाकले होते. नंतर मुकेशलादेखील क्लीन चिट मिळाली.
पुनरागमन : आता तो त्याच चित्रपटावर काम करत आहे. ज्यातून त्याला काढले गेले होते.

X
COMMENT