आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराची गाडी पेटवली, राजू शेट्टींनी केला भाजपवर आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - स्वाभिमानी पक्षाचे वरूड मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या गाडीवर मतदानाच्या दिवशीच सकाळी हल्ला करण्यात आला. यात त्यांची अख्खी गाडी पेटवण्यात आली. स्वभिमानीने याविरोधात तक्रार दाखल केली. तर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी थेट भाजवर आरोप केला आहे.

भाजप उमेदवारांकडून पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर हल्ला
राजू शेट्टींनी सांगितल्याप्रमाणे, भाजपचे उमेदवार पैसे वाटत होते. भुयार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. परंतु, कारवाई काहीच झाली नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात मतदानाच्या दिवशी भल्या पहाटे साडे पाचच्या सुमारास देवेंद्र भुयार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गाडी अडवण्यात आली. सुरुवातीला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर गाडी पेटवण्यात आली. यावेळी गोळीबारही झाला असा दावा शेट्टींनी केला आहे.