आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राच्या उदासीनतेमुळे काश्मीरमध्ये शेतकऱ्यांना १० हजार काेटींचा फटका, राजू शेट्टींचा आराेप  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मिरमधील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना राजू शेट्टी - Divya Marathi
काश्मिरमधील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना राजू शेट्टी

पुणे - कलम ३७० हटवल्यानंतर त्याचा सर्वाधिक ताेटा काश्मीरमधील शेतकऱ्यांना झाला. संचारबंदी व  नोव्हेंबरमधील पानगळ हाेण्याअगाेदरच्या अवकाळी बर्फ वृष्टीमुळे सफरचंदाची झाडे मोडून पडली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे १५ वर्षात भरून न येणारे तब्बल १० हजार काेटींचे नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीही केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे एकाकी व उपेक्षितांची भावना निर्माण होऊन काश्मिरी शेतकरी आत्महत्या करू शकतात. त्यामुळे केंद्राने काश्मिरी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी साेमवारी पुण्यात केली. 

काश्मीरच्या शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडवर तेथील सफरचंदाच्या बाजाराची जबाबदारी टाकली. मात्र ज्याप्रमाणे अापल्या राज्यात नाफेड कांदा, सोयाबीन, तूर, हरभरा बाजारात घोळ घालतात. त्याप्रमाणे काश्मीरमध्ये देखील सफरचंदाच्या बाजारपेठेत या संस्थेने गोंधळ घातला. अचानक बाजारात सफरचंद उतरवत पडत्या भावात विकली. त्यामुळे सफरचंदाचे भाव पडले. नाफेडने काश्मीरमधील सफरचंदाला चांगला भाव देण्याऐवजी भाव पाडले. सफरचंदाच्या १७ लाख टन उत्पादनापैकी नाफेडने फक्त १.५ लाख पेट्या सफरचंदाची खरेदी केली आहे, याकडेही शेट्टी यांनी लक्ष वेधले.सरकारला न सांगता काश्मिरात गेलो
 
विरोधकांना काश्मीरमध्ये प्रवेशबंदी असल्याने तेथील शेतकऱ्यांचे हाल जगासमोर आले नाहीत. मात्र मी सरकारला न सांगता जिवावर उदार होऊन काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये गेलाे. म्हणून तेथील खचलेल्या शेतकऱ्यांना मला भेटता आले. विरोधी पक्षांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काश्मीरच्या शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरावा, म्हणून शरद पवारांना देखील आपण भेटल्याचे शेट्टी यांनी सांगितले.फळप्रक्रिया उद्योगावरही प्रतिकूल परिणाम

सप्टेंबरमध्ये काश्मीरमधील सफरचंद तोडणी हंगाम सुरू होतो. यंदा सफरचंदाचे चांगले उत्पादन झाले. मात्र साठवणूक केंद्रे अपुरी पडली. केशर, अक्रोड, स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. सफरचंद नाशिवंत असताना शेतकऱ्यांना १० ते १५ दिवस वाट पाहावी लागली. एकाच वेळी सफरचंद बाजारात आल्यावर भाव पडले. फळप्रक्रिया उद्योगावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.राष्ट्रपती आपल्या सूचकालाच विसरले

काश्मीरवरून परतल्याबरोबर शनिवारी व रविवार मी राष्ट्रपतींशी भेट मागितली हाेती. काश्मीर व महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची कल्पना देण्यासाठी आपल्याला त्यांना भेटायचे हाेते. मात्र राष्ट्रपती भवनातून भेट नाकारण्यात आली. खरे तर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मी रामनाथ काेविंद यांचा सूचक होतो. म्हणून तरी ते भेटतील अशी आशा होती. परंतु निवडून आल्यावर राष्ट्रपती सूचकाला देखील विसरले, अशी खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...