आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीने निर्णय न केल्यास 15 जागांवर उमेदवार उभे करणार, राजू शेट्टींचा अल्टीमेटम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आम्ही तीन जागांची मागणी केली असून, अद्याप त्यांच्या कडून कोणताही निरोप आलेला नाही. उद्या (बुधवार) पर्यंत आम्ही त्याच्या निरोपाची वाट पाहू अन्यथा आम्ही 15 जागांवर लढण्याची तयारी केली असून, तेथील उमेदवार देखील निश्चित केले आहेत. तसेच माढामधून पवार यांनी माघार घेतली असून आम्ही तेथे देखील लढण्यास तयार आहोत असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

 

महादेव जानकर यांनी देखील आता युतीमधून बाहेर पडावे आणि स्वाभिमानी सोबत यावे आम्ही त्याचे स्वागत करू असे देखील शेट्टी यांनी नमूद केले.

 

शेट्टी म्हणाले,मंगळवारी पुण्यात पक्षातील महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक झाली, यात आम्ही असे ठरविले आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी जगावतपाबाबत अनेक चर्चा झाल्या असून आमच्यासाठी 3 जागा सोडाव्यात असे आम्ही सांगितले आहे. परंतु, अद्याप आघाडी कडून आम्हाला कोणताही निर्णय सांगण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या निर्णयाची उद्यापर्यंत वाट पाहु अन्यथा स्वतंत्र पाणे 15 जागेवर आमचे उमेदवार लढण्यास तयार आहेत.  यात बारामती, शिरूर, हातकणंगले, कोल्हापूर, औरंगाबाद, नंदुरबार, शिर्डी, सांगली, माढा, परभणी, नाशिक, वर्धा, बुलढाणा, सोलापूर आदी जागांवर आमचे उमेदवार तयार आहेत. आघाडी झाल्यास दोघां सोबत होऊ शकते त्यामुळे दोन्ही पक्षनी मान्य करावे. राष्ट्रवादीने काही गोष्टी मान्य केले आहेत. आघाडीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी संपर्कात आहे असे त्यांनी नमूद केले.

 

पवार लढणार नसतील तर आम्ही तयार
माढा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार नसतील तर आमच्याकडे या मतदारसंघासाठी उमेदवार तयार आहे आणि ही जागा आम्ही लढायला तयार आहोत याआधी म्हाडामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी यांचेच वर्चस्व राहिले आहे. मागील वेळेस आम्ही पंचवीस हजाराच्या फरकांनी येथील जागा गमावली होती त्यामुळे आमच्या ताकद आहे.

 

जानकर यांनी 'स्वाभिमानी'सोबत यावे
आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि माझ्यात झालेली बैठक अनौपचारिक होती. आम्ही दोघे जुने मित्र आहोत. परंतु एकत्र भेटल्यानंतर काही सुख दुःखाच्या गोष्टी होणारच. लहान पक्ष्यांना त्रास देणे हे सर्वच मोठे पक्ष करीत असतात त्यामुळे आता जाणकारांनी युतीतून बाहेर पडून स्वाभिमानी सोबत यावे आम्ही त्यांचे स्वागत करू असेदेखील शेट्टी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...