राजकारण / आघाडी सरकारपेक्षा युती सरकारचे सूडबुद्धीने कामकाज - राजू शेट्टी

पोलिसच भाजपच्या टीशर्टमध्ये दिसतात

Sep 21,2019 08:41:00 AM IST

पुणे - काँग्रेस आणि राष्ट्रवादी साधू-संत असल्याचे प्रतिज्ञापत्र मी दिले नाही. मात्र, भाजप आणि शिवसेना सत्तेचा गैरवापर करत असून त्यांच्या विराेधातील मतांचे विभाजन हाेऊ नये यासाठी आघाडीशी जवळीक साधली आहे. मी अनेक मुख्यमंत्र्यांविरोधात संघर्ष केला, पण आतापर्यंत मला सर्वाधिक त्रास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला आहे. अघोषित आणीबाणी सध्या जाणवत असून आघाडी सरकारपेक्षा युती सरकार सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.


एका वाहिनीने आयाेजित केलेल्या कार्यक्रमात पुण्यात ते शुक्रवारी बोलत होते. शेट्टी म्हणाले, महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री राज्यभरात विविध ठिकाणी फिरले. मात्र, पाच वर्षे सत्तेत राहून सरकारने काय केले हे सांगितले नाही. विरोधकांनी आतापर्यंत काय केले नाही हेच सांगत राहिले. त्यामुळे नक्की त्यांच्या यात्रेचा उद्देश काय हाेता? एका बाजूला पाकिस्तानला घरात घुसून धडा शिकवण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे त्यांच्याकडूनच साखर,कांदा आयात करतात हा कसला राष्ट्रवाद आहे.


पोलिसच भाजपच्या टीशर्टमध्ये दिसतात
कडकनाथ कोंबडी प्रकरणात ५०० कोटींचा चार राज्यांत घोटाळा झाला. परंतु सरकार याबाबत काहीच कारवाई करताना दिसत नाही. पोलिस कर्मचारी मुख्यमंत्री यात्रेत भाजपचे टीशर्ट घालून फिरतात, असा आरोपही राजू शेट्टी या वेळी बोलताना केला.

X