आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभागृहातील मार्शलचे ड्रेस बदल्यामुळे माजी लष्कर अधिकाऱ्यांची हरकत, सभापती नायडू म्हणाले- फेरविचार करु  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यसभेतील 250 व्या अधिवेशनाचे औचित्य साधून सभागृहातील मार्शलला नवीन ड्रेस देण्यात आली. ड्रेसवरुन आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यांच्या या नवीन ड्रेसवर माजी लष्करप्रकमुख आणि काही नेत्यांनी हरकत व्यक्त केली आहे. लष्कर अधिकाऱ्यांचे म्हणने आहे की, ड्रेस आर्मीतील ब्रिगेडियर रँक आणि त्याच्यावरील पदांशी मिळती जुळती आहे. या डार्क ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये राज्यसभेतील मार्शल टोपी घातलेले दिसत आहेत. तर जुन्या ड्रेसचा कलर क्रीम होता आणि मार्शल पारंपरिक पगडी घातल होते. राज्यसभेतील सुत्रांनी सांगितल्यानुसार 5 दशकानंतर मार्शलचा ड्रेस बदलण्यात आला आहे.यावर सभापती वेंकैया नायडू म्हणाले की, ''राज्यसभा सचिवालयने मार्शलसाठी नवीन ड्रेस अनेक विचार विनिमय करून आणला. आम्हाला यासाठी राजकीय आणि इतर क्षेत्रातील मान्यवर लोकांचे विचार मिळाले. मी सचिवालयाला याबाबतीत परत विचार करण्यास सांगितले आहे.

मिल्ट्री यूनिफॉर्मची नक्कल करने चुकीचे- जनरल मलिक
 
माजी लष्करप्रमुख जनरल वीपी मलिक यांनी ट्वीट केले, "मिल्ट्री यूनिफॉर्मची नक्कल करणे आणि लष्करात नसलेल्या व्यक्तीने याला परिधान करणे चुकीचे आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. आशा आहे की, उपराष्ट्रपती वैंकेया नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्यसभा सचिवालय लवकरच यावर योग्य तो निर्णय घेईल." त्यांच्या शिवाय केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल वीके सिंह यांनीदेखील मार्शलचे ड्रेस आर्मी युनिफॉर्मप्रमाणे करण्याला चुकीचे सांगितले.