आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग; हृतिक रोशनने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी घशाचा कर्करोग (squamous cell carcinoma of the throat) झाला आहे. राकेश यांचा कॅन्सर प्राथमिक स्वरुपाचा असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. बॉलिवूडचा सुपरहिरो अभिनेता हृतिक रोशनने आपल्या वडिलांसोबत फोटो शेअर करून ही दुखद माहिती दिली. हृतिकने इस्टाग्रामवर लिहिले, त्याचे वडील राकेश रोशन यांच्या घशावर मंगळवारी शस्त्रक्रिया केली जात आहे. सर्जरीच्या दिवशी सुद्धा त्यांनी आपले जिम सेशन विसरलेले नाहीत. या फोटोमध्ये दोघेही जिममध्ये पोझ देताना दिसून येत आहेत.

 

हृतिकने आपले वडील राकेश रोशन यांच्यासोबत फोटो शेअर करताना लिहिले, "आज सकाळीच मी डॅडसोबत हा फोटो क्लिक केला आहे. मला माहिती होते की सर्जरीच्या दिवशी सुद्धा ते आपले जिम सेशन मिस करणार नाहीत. ते माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत व्यक्ती आहे. त्यांना घशाचा कर्करोग आहे आणि हा कर्करोग प्राथमिक स्टेजला आहे. एक परिवार म्हणून आम्ही खूप भाग्यशाली आहोत की आम्हाला असा लीडर मिळाला."

 

1970 मध्ये राकेश रोशन यांनी 'घर घर की कहानी' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तर 1987 मध्ये त्यांनी 'खुदगर्ज' या चित्रपटाच्या माध्यमातून एक दिग्दर्शक म्हणून डेब्यू केले. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा आणि जीतेंद्र मुख्य भूमिकेत होते. यानंतर 2000 मध्ये राकेश रोशन यांनी आपला मुलगा हृतिकला 'कहो ना प्यार है' या चित्रपटात लॉन्च केले होते. हृतिकचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्यांनी हृतिकला घेऊन इंडियन सुपरहिरो फिल्म सिरीझ क्रिश सुरू केली. राकेश रोशन यांनी 'खून भरी मांग', 'कोयला' आणि 'करण अर्जुन' असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...