आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

69 वर्षांच्या राकेश रोशन यांचा कॅन्सर सर्जरीनंतरचा पहिला फोटो, नाकात ट्यूब लावलेली दिसली, पहिल्यापेक्षा थोडे कमजोरही दिसले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 69 वर्षांचे अभिनेते, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर राकेश रोशन यांना थ्रोट कैंसर डिटेक्ट झाला आहे. त्यांची सर्जरीही झली आहे. सर्जरीनंतर राकेश यांचा पहिला फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते पत्नी पिंकी, मुलगा ऋतिक, नात सुरानिका आणि नातू ऋदान यांच्यासोबत दिसत आहेत. फोटोमध्ये दिसते की, राकेश रोशन यांच्या नाकात ट्यूब लागलेली आहे आणि ते पहिल्यापेक्षा थोडे कमजोरही दिसत आहेत. पण या फोटोमुळे ऋतिकला ट्रोल केले जात आहे. फोटोमध्ये ऋतिक खुर्चीवर बसलेला आहे आणि बाकी सर्व लोक उभे आहेत. 

 

सोशल मीडिया यूजर्स करत आहेत अशा कमेंट्स...
- ऋतिकला ट्रोल करत एक सोशल मीडिया यूजरने लिहिले, "सर्जरी वडीलांची झाली आहे आणि बसले तुम्ही आहात खुर्चीवर". दुसऱ्या एका यूजरने लिहिले, "मलाही हेच म्हणायचे होते". मात्र , काही युजर्स याचे स्पष्टीकरणही देत आहेत. एक जण म्हणाला, "कारण तो बर्थडेबॉय होता आणि त्यांच्यामध्ये चांगली ट्यूनिंग आहे". ऋतिकने गुरुवारी आपला 45 वा बर्थडे सेलिब्रेट केला. मात्र, वडिलांच्या सर्जरीमुळे त्याने ग्रैंड सेलिब्रेशन केले नाही. 

 

ऋतिकने सर्वात अगोदर शेयर केली होती राकेश यांच्या कॅन्सरची बातमी... 
- मंगलवारी स्वतः ऋतिकने हि बातमी सोशल मीडियावर शेयर केली होती. त्याने लिहिले होते, "आज सकाळीच मी डॅडसोबत हा फोटो क्लिक केला आहे. मला माहिती होते की सर्जरीच्या दिवशी सुद्धा ते आपले जिम सेशन मिस करणार नाहीत. ते माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत व्यक्ती आहे. त्यांना घशाचा कर्करोग आहे आणि हा कर्करोग प्राथमिक स्टेजला आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला असा लीडर मिळाला."

 

- ऋतिकच्या ट्वीटवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन राकेश रोशन यांच्या बरे होण्याची प्रार्थना केली. पंतप्रधानांनी लिहिले की, 'डियर हृतिक मी राकेश रोशन यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतोय. ते एक फायटर आहेत आणि मुला विश्वास आहे की, ते या आव्हानाचा हिंमतीने सामना करतील". मोदींच्या या ट्वीटवर ऋतिकने रिप्लाई देत लिहिले, "तुमचे कंसर्न आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद सर. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, डॉक्टर्सने सांगितले आहे, सर्जरी खूप चांगली झाली आहे". 

बातम्या आणखी आहेत...