आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी सावंतने तोडले अकलेचे तारे.. अनूप जलोटांसाठी अश्लील शब्दांचा वापर, ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतने 'बिग बॉस 12' या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले भजन गायक अनूप जलोटांची खिल्ली उडवली आहे. एका मुलाखतीत राखीने 65 वर्षीय अनूप आणि त्यांच्यापेक्षा 37 वर्षांनी लहान असलेल्या त्यांच्या गर्लफ्रेंडविषयी बेताल वक्तव्य केले आहे. तिने अश्लील शब्दांचा वापर करत अनूप जलोटांकडे त्यांची गर्लफ्रेंड टिकणार नाही, नाही असे म्हटले आहे. गर्लफ्रेंडला थांबवण्यासाठी जे महत्त्वाचे काम एखाद्या पुरुषाला करायला हवे, ते अनूप जलोटा करु शकत नाहीत, असे राखी म्हणाली आहे. पुढे ती म्हणाली, अनूप यांच्या तिन्ही पत्नी त्यांना सोडून निघून गेल्या आहेत. ती इथवरच थांबली नाही तर तिने अनूप यांच्यासाठी एक संदेशही दिला. "जर जसलीन तुम्हाला सोडून निघून गेली तर काळजी करु नका... मी आहे...", असे राखी म्हणाली आहे. 


जसलीन चांगली मैत्रीण असल्याचे सांगते राखी... 
- मुलाखतीत राखीने सांगितले की, जसलीन तिची जवळची मैत्रीण आहे. संघर्षाच्या काळात जसलीनचे वडील केस मथारु यांनी तिला मदत केली होती. केसर मथारु यांनी राखीला लीड रोलमध्ये घेऊन एक चित्रपट बनवला होता, त्याचे नाव 'लफडा' असल्याचे तिने सांगितले. 

 

राखीला करायचे आहेत स्तनदान....
अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांच्या नात्याची खिल्ली उडविणाऱ्या राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिने अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राखीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने स्तनदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये तिने स्तनदान का करायचे या मागील कारणही सांगितले. विशेष म्हणजे तिचे हे वक्तव्य प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलं आहे, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ‘जगात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या इतरांसाठी आपल्या मदतीचा हात पुढे करत असतात. गरजू रुग्णांना आपले अवयवदान करुन त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात करुन देण्यास मदत करत असतात. त्यामुळेच मी देखील या गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. मी जास्त काही मदत करु शकत नाही. पण जे माझ्याकडे आहे ते मी नक्कीच देऊ शकते’, असं राखी म्हणाली.


पुढे ती म्हणाली, ‘आतापर्यंत अनेकांनी डोळे , फुफ्फुस, वैगरे यासारख्या महत्वाच्या अवयवांचं दान केलं आहे. मात्र मी माझं स्तनदान करु इच्छिते.’ राखीच्या या व्हिडिओमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली असून तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...