आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rakhi Sawant Did Not Secretly Get Married, She Did Bridal Photo Shoot For The Calendar, Rakhi Revealed Herself

राखी सावंतने नाही केले गुपचुप लग्न, कॅलेंडरसाठी केले होते ब्रायडल फोटोशूट, स्वतः राखीने केला खुलासा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : राखी सावंतबद्दल अनेक दिवसांपासून ही अफवा उडाली आहे की, तिने मुंबईमध्ये गुपचुप लग्न केले आहे. ज्वेलरी ब्रँड सायाेनारा आणि तिचा ब्रायडल मेकअप करणाऱ्या आर्टिस्ट गुरप्रीत घुरानेदेखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर राखीचा लुक शेअर केला आणि लिहिले, सेलेब ब्राइड. पण या सर्व बातम्या चुकीच्या आहेत, स्वतः राखी सावंतने दैनिक भास्करला फोनवर याबद्दल माहिती दिली की, ही केवळ एक अफवा आहे. 

 

2020 मध्ये करणार आहे लग्न... 
राखीने सांगितले की, हे एका कॅलेंडरसाठी केलेले ब्रायडल फोटोशूट होते. मात्र तिने सांगितले की, पुढच्यावर्षी ती लग्नाचा प्लॅन नक्कीच करणार आहे. 28 जुलैला मुंबईच्या हॉटेल जेडब्ल्यू मेरिएटमध्ये तिने केवळ ब्रायडल फोटोशूट केले आहे.  

 

2009 मध्ये रचले होते स्वयंवर... 
ही पहिली वेळ नाही जेव्हा राखी सावंतच्या लग्नाच्या चर्चा समोर येत आहेत. यापूर्वीही तिने डिसेंबर 2018 मध्ये दीपक कलालसोबत एक प्रेस कॉन्फरन्स केली होती, ज्यामध्ये तिने आपल्या लग्नाचे प्लनिंग सांगितले होते. पण दोघांचेही लग्न झाले नाही. यापूर्वीही 2009 मध्ये 'राखी का स्वयंवर' नावाने एक रियलटी टीव्ही शोदेखील तिने केला होता. 

बातम्या आणखी आहेत...