Home | Gossip | Rakhi Sawant gave poses with Pakistani flag, users trolling her, a Pakistani girl gives advice

पाकिस्तानी झेंड्यासोबत राखी सावंतची पोज पाहून भडकले फॅन्स, पाकिस्तानच्या एका मुलीनेही दिला सल्ला

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 09, 2019, 05:32 PM IST

व्हिडीओ पोस्ट करून राखीने दिले स्पष्टीकरण... 

  • Rakhi Sawant gave poses with Pakistani flag, users trolling her, a Pakistani girl gives advice

    मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासोबत पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये राखी एका सुंदर लोकेशनजवळ पोज देत आहे. राखीचा फोटो पाहून अनेक लोक चिडले आहेत. पण जसे त्यांनी राखीफोटोवरचे कॅप्शन पहिले त्यांना कळाले की, खरे काय आहे.

    फोटोसोबत राखीने लिहिले होते, "मला माझा भारत देश खूप आवडतो, पण हा माझी आगामी फिल्म 'धारा 370' चा एक सीन आहे." राखी सावंतने एक व्हिडीओ करून फॅन्स आणि फॉलोअर्ससमोर आपले म्हणणे मांडले आहे. ती म्हणाली, "हाय फ्रेंड्स, हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. या फिल्मचे नाव 'धारा 370' आहे. जी कश्मीरच्या पंडितांवर आधारित आहे."

    राखी म्हणाली, "मी या फिल्ममध्ये एका पाकिस्तानी मुलीचा रोल करत आहे. तुम्ही माझा कॉस्ट्यूम चेक करू शकता. माझे कॅरेक्टर या फिल्ममध्ये त्या दहशतवादी संगठनांचे भांडे फोडते, जे लहान मुलांना जिहादी बनवण्याचे काम करतात."

    मात्र राखीच्या या व्हिडिओवर पाकिस्तानच्या एका मुलीने हरकत दर्शवली आहे. संबरीना खमीसाने राखीसाठी लिहिले, "तुम्ही आमचे कल्चर डिफाइन करू शकत नाही. पाकिस्तान इस्लामला फॉलो करतो आणि आणि हा खूप पवित्र आणि शांततेचा धर्म आहे. मला पाकिस्तानवर प्राउड फील होते आणि माझे माझ्या कल्चरवर खूप प्रेम आहे. " तर राखी सावंतने या यूजरला उत्तर देत लिहिले, "ही माझी फिल्म आहे आणि जर तुला मी आवडत नाही तर तू माझ्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून जाऊ शकतेस."

Trending