आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या घरात मुलींना घराबाहेर पडण्याची नव्हती परवानगी, त्या कुटुंबातील मुलगी बनली चित्रपटसृष्टीची आयटम गर्ल, तिला 'राखी सावंत' या नावाने ओळखतात लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः ड्रामा क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतने (25 नोव्हेंबर) वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. 1978 मध्ये जन्मलेल्या राखीने बॉलिवूडशिवाय इतर अन्य भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अशा एका कुटुंबातून आली आहे, जिथे महिलांना उंबरठ्याबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तरीदेखील तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुटुंबीयांचा विरोध पत्कारुन घर सोडले. इतकेच नाही तर चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी फेस सर्जरी आणि ब्रेस्ट इम्प्लांट केले. एवढे सगळे करुन राखी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरली आणि फक्त आयटम गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.  


- राखीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती अशा एका कुटुंबातून आहे, जिथे महिलांना कुठलेच स्वातंत्र्य नाही. तिच्या कुटुंबातील महिला पुरुषांच्या नजरेत नजर टाकून बोलू शकत नाहीत.


- मुलाखतीत राखीने पुढे सांगितले होते, की संकुचित विचारसरणी असूनदेखील तिचे कुटुंबीय पैशांसाठी मुलींना कामावर पाठवत होते. राखीने वयाच्या 10 व्या वर्षी बिझनेसमन अनिल अंबानींच्या लग्नात जेवण वाढण्याचे काम केले होते. केटरिंगच्या कामासाठी तिला दररोज 50 रुपये मिळत होते.

 

तेच कपडे आज बनले फॅशन... 

राखीने सांगितले होते, 'जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत कामाच्या शोधात होते तेव्हा माझ्याजवळ चांगले कपडे नव्हते. जे असेल ते कपडे परिधान करुन मी लोकांना भेटत होते. तेच कपडे आज फॅशनमध्ये आहेत.' 

- रिपोर्ट्सनुसार, राखी 11 वर्षांची असताना तिने दांडिया खेळण्याचा हठ्ठ धरला होता, त्यामुळे तिच्या आई आणि मामाने तिचे लांब केस कापून टाकले होते. त्याचवेळी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन काम करणार असल्याचा निर्णय राखीने घेतला होता.

 

अभिनेत्री होण्यासाठी सोडले होते घर

राखीने अभिनेत्री होण्यासाठी आपले घर सोडले होते. जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा तिने काम मिळवण्यासाठी निर्मात्यांच्या ऑफिसचे उंबरठे झिजवले होते. तिला तिच्या लूकमुळे काम मिळत नव्हते. त्यामुळे तिने फेस सर्जरीसोबतच ब्रेस्ट इम्प्लांट केले. त्यानंतर राखीला काम मिळायला सुरुवात झाली खरी पण ती अभिनेत्री म्हणून नव्हे तर आयटम गर्ल म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकली.

 

15 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे राखी...

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आकेडवारीनुसार, राखी 15 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. तिच्याजवळ मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला असून त्याची एकुण किंमत 11 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याजवळ 21.6 लाख रुपयांची फोर्ड एंडेवर कार आहे. राखी ही सर्व कमाई स्टेज परफॉर्मन्सच्या माध्यमातून करत असते.

 

1997 मध्ये सुरु केले होते राखीने करिअर...

- राखीने 1997 मध्ये आलेल्या 'अग्निचक्र' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. अनेक चित्रपटांमध्ये तिने हिट आयटम नंबर्स दिले आहेत. 
- राखीने बिग बॉसशिवाय 'नच बलिए 3', 'ये है जलवा', 'अरे दीवानों मुझे पहचानों', 'राखी का स्वयंवर' या रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे. 
- 'राखी का स्वयंवर' या रिअॅलिटी शोमध्ये राखीने टोरंटोच्या एका स्पर्धकासोबत साखरपुडा केला होता, पण काही महिन्यांनी तिने ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले होते.

 

स्वतःला सांगितले होते अशिक्षित... 
राखीने 2014 मध्ये राष्ट्रीय आम पार्टीची स्थापना करुन निवडणूक लढवली होती. टीओआईच्या रिपोर्टनुसार, यावेळी तिने सादर केलेल्या एफिडेविटमध्ये ठळख अक्षरांमध्ये स्वतःला 'illiterate' असल्याचे सांगितले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...