आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी सावंतने स्वतःच्या घराचा व्हिडिओ केला शेअर, नेटक-यांनी लगावला टोला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत हिला कायम चर्चेत कसे राहायचे हे चांगलेच ठाऊक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम लोकांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात असते. यासाठी ती तिचे व्हिडिओ आणि फोटो कायम शेअर करत असते. अलीकडेच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या लग्नाची बातमी दिली होती. लंडन रहिवाशी असलेल्या रितेश नावाच्या मुलाशी लग्नगाठ बांधली असल्याचे राखीने सांगितले होते. या  लग्नसोहळ्याला अतिशय मोजके लोक उपस्थित असल्याचे तिने सांगितले होते. लग्नानंतर तिने करवा चौथनिमित्त एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. आता राखी सावंतने तिच्या पतीच्या घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण हा व्हिडिओ बघून लोकांनी तिला ट्रोल केले आहे.

'तू असं खोटं का बोलते आहेस? घर आणि हॉटेलची रूम यातील फरक आम्ही सहज ओळखू शकतो' असा टोला तिला नेटकऱ्यांनी लगावला आहे. इतकेच नाही तर हा व्हिडिओ आताच मी टिकटॉकवर पाहिला, असेही एका नेटकरीने लिहिले. 

बातम्या आणखी आहेत...