Home | Jeevan Mantra | Dharm | Raksha Bandhan 2018 Auspicious Time For Rakhi

शनिवारी संध्याकाळी 4.23 पासून पौर्णिमा, 26 ऑगस्टला रात्री 11 पर्यंत बांधू शकता राखी

रिलिजन डेस्क | Update - Aug 25, 2018, 12:02 AM IST

रक्षाबंधनचा सण 26 ऑगस्टला धनिष्ठा नक्षत्राच्या शुभ योगामध्ये साजरा केला जाईल. श्रावण शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी यावेळी

 • Raksha Bandhan 2018 Auspicious Time For Rakhi

  रक्षाबंधनचा सण 26 ऑगस्टला धनिष्ठा नक्षत्राच्या शुभ योगामध्ये साजरा केला जाईल. श्रावण शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी यावेळी रविवारी येत आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या संयोगामुळे हा सण आणखी खास झाला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये धनिष्ठा नक्षत्रला पंचकाचे नक्षत्र मानले गेले आहे. परंतु धनिष्ठा नक्षत्राचा उत्तरार्ध (शुक्ल पक्षीय) असल्यास हे पाचपट जास्त फळ देणारे नक्षत्र ठरते. पर्व काळ सौम्य किंवा पूर्ण तिथीला आणि धनिष्ठा नक्षत्र स्पर्शकर्ता असेल तर हे कल्याणकारी आहे.


  रक्षाबंधनला तिथीचे गणित असे
  पं. अमर डिब्बावाला यांनी सांगितले की, चित्रा केतकीय गणनेनुसार श्रावण शुक्ल पौर्णिमा तिथी 25 ऑगस्ट, शनिवारी संध्याकाळी 4.23 वाजता लागले. परंतु तिथी सिद्धांतानुसार उद्यकाळात स्पर्श तिथी असल्यास ती सूर्यास्तापर्यंत मानली जाते. यामुळे उदय काळात रविवारी रक्षाबंधन साजरे केली जाईल. ही तिथी संध्याकाळी 6.22 पर्यंत राहील परंतु रविवारी संपूर्ण दिवस तसेच रात्रीपर्यंत पर्वकाळ राहील. यावेळी भद्रा संयोग नसल्यामुळे रात्रीपर्यंत राखी बांधली जाऊ शकते.


  रक्षाबंधनाचे शुभ मुहूर्त...
  सकाळी 07.30 ते 9 पर्यंत - चर.
  सकाळी 09 ते 10.30 पर्यंत- लाभ.
  सकाळी 10.30 ते दुपारी 12 पर्यंत- अमृत.
  सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 पर्यंत- अभिजीत मुहूर्त.
  दुपारी 01.30 ते 3 पर्यंत- शुभ.
  संध्याकाळी 06.46 ते रात्री 11 पर्यंत क्रमश: शुभ, अमृत आणि चर मुहूर्तामध्ये राखी बांधली जाऊ शकते.

Trending