Home | Jeevan Mantra | Dharm | Raksha Bandhan 2018 Interesting Fact Related To Rakshabandhan

रक्षाबंधन 26 ऑगस्टला : केव्हापासून साजरा केला जातो हा सण, देवी लक्ष्मीने राजा बळीला बांधली होती राखी

रिलिजन डेस्क | Update - Aug 23, 2018, 12:30 PM IST

रक्षाबंधन (26 ऑगस्ट, रविवार) हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. काळाच्या ओघात या सणाला राखी किंवा राखी पौर्णिमा म्हणण्यात

 • Raksha Bandhan 2018 Interesting Fact Related To Rakshabandhan

  रक्षाबंधन (26 ऑगस्ट, रविवार) हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. काळाच्या ओघात या सणाला राखी किंवा राखी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. या सणाला कधीपासून सुरूवात झाली, याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. परंतु अतिशय प्राचीन काळापासून या सणाचे संदर्भ मिळतात. भविष्य पुराणात एक कथा आहे. या कथेत रक्षाबंधनाविषयी माहिती मिळते.


  अशी आहे कथा
  एकदा देवता आणि दानव यांच्यामध्ये 12 वर्षे युद्ध झाले परंतु देवतांना विजय मिळाला नाही. तेव्हा इंद्रदेव दु:खी होऊन देवगुरू बृहस्पती यांच्याकडे गेले. गुरू बृहस्पती म्हणाले की युद्ध थांबविले पाहिजे. तेव्हा त्यांचे बोलणे एकूण इंद्रपत्नी शचीने म्हटले की, उद्या श्रावण शुक्ल पौर्णिमा आहे. 'मी एक रक्षासूत्र बनवेन. या रक्षासूत्राच्या प्रभावाने तुमचे रक्षण होईल आणि तुम्हास विजय प्राप्त होईल.' इंद्राणीने व्रत धरून तयार केलेले हे रक्षासूत्र इंद्राने बांधून घेतले आणि राक्षसांवर विजय मिळविला.


  देवी लक्ष्मीने बळी राजाला बांधली होती राखी
  एकदा बळीराजा यज्ञ करीत होता. यज्ञानंतर दानधर्माची पद्धत होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतल्यानंतर बळी राजाला तीन पावले जमीन मागितली. वामन अवतारी विष्णू यांनी प्रचंड रूप धारण केले, एक पाऊल स्वर्गात, दुसरे भू लोकावर आणि तिसरे बळी राज्याच्या डोक्यावर ठेवले. बळी राजाची उदारता पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. परंतु बळी राजाने वर मागितला की, भगवान विष्णू यांनी राज्याचे द्वारपाल व्हावे. तेव्हा विष्णूदेवाने बळीला वर दिला. परंतु यामुळे देवी लक्ष्मी विचारात पडल्या. लक्ष्मी देवीला प्रश्न पडला की, स्वामी विशू पाताळ लोकांचे द्वारपाल बनले तर वैकुंठ लोकचे काय होणार?


  तेव्हा देवऋषी नारदांनी एक उपाय सांगितला. देवी लक्ष्मी यांनी बळीच्या हातावर रक्षासूत्र बांधून त्याला भाऊ करून घ्यावे. देवी लक्ष्मीने असेच केले. राजा बळीने देवी लक्ष्मीला भेट मागण्यात सांगितले तेव्हा देवीने भगवान विष्णूंना मागितले. रक्षासूत्रामुळे देवी लक्ष्मीला त्यांचे स्वामी परत मिळाले.

Trending