Home | Jeevan Mantra | Dharm | Raksha Bandhan 2018 Pooja Plate information

रक्षाबंधन उद्या : पूजेच्या ताटामध्ये असावा पाण्याचा कलश, यामध्ये निवास करतात सर्व देवता

रिलिजन डेस्क | Update - Aug 25, 2018, 12:01 AM IST

भाऊ आणि बहिणीसाठी रक्षाबंधन (26 ऑगस्ट) एक महापर्व आहे. या दिवशी सर्व बहिणी भावाला राखी बांधतात

 • Raksha Bandhan 2018 Pooja Plate information

  भाऊ आणि बहिणीसाठी रक्षाबंधन (26 ऑगस्ट) एक महापर्व आहे. या दिवशी सर्व बहिणी भावाला राखी बांधतात. राखी बांधण्यापूर्वी एक विशेष ताट तयार केले जाते. या ताटामध्ये कोणकोणत्या सात गोष्टी असाव्यात, हे जाणून घ्या...


  कुंकू -
  कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कुंकुवाचा टिळा लावून केली जाते. ही प्रथा खूप प्राचीन असून आजही या प्रथेचे पालन केले जाते. टिळा मान-सन्मानाचे प्रतिक आहे. बहिण भावाला टिळा लावून त्याचा सन्मान करते तसेच भावाच्या कपाळावर टिळा लावून बहिण त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यामुळे कुंकुवाचे महत्त्व जास्त आहे.


  तांदूळ -
  टिळा लावल्यानंतर त्यावर तांदूळ अवश्य लावावेत. तांदळाला अक्षता म्हणतात. अक्षता म्हणजे ज्या अखंड आहेत, अपूर्ण नाही. टिळा लावल्यानंतर त्यावर अक्षता लावण्यामागे हेतू हाच आहे की, भावाच्या जीवनावर नेहमी शुभ प्रभाव कायम राहावा.


  नारळ -
  बहिण आपल्या भावाला टिळा लावल्यानंतर हातामध्ये नारळ देते. नारळाला श्रीफळ म्हटले जाते. हे सुख-समृद्धीचे प्रतिक आहे. बहिण भावाला नारळ देऊन त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना करते.


  रक्षासूत्र (राखी)
  रक्षासूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष म्हणजे, वात, पित्त आणि कफ. आपल्याला झालेला कोणताही आजार या तीन दोषांशी संबंधित आहे. रक्षासूत्र मनगटावर बांधल्यामुळे शरीरामध्ये या तिघांचे संतुलन कायम राहते. हा धागा बांधल्याने मनगटाच्या नसांवर दबाव पडतो, ज्यामुळे हे तिन्ही दोष नियंत्रित राहतात. रक्षा सूत्रचा अर्थ आहे, असा धागा (दोरा) ज्यामुळे आपल्या शरीराचे रक्षण होते. राखी बांधण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भाऊ आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.


  पाण्याने भरलेला कलश -
  राखीच्या ताटामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो. हेच पाणी कुंकुवामध्ये मिसळून टिळा लावला जातो. प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या कलशामध्ये सर्व पवित्र तीर्थ आणि देवी-देवतांचा वास असतो. या कलशाच्या प्रभावाने भाऊ आणि बहिणीच्या जीवनात नेहमी सुख आणि प्रेम कायम राहते.

 • Raksha Bandhan 2018 Pooja Plate information

  मिठाई -
  राखी बांधल्यानंतर बहिण भावाला मिठाई खाऊ घालून त्याचे तोंड गोड करते. मिठाई खाऊ घालण्यामागचे कारण म्हणजे बहिण आणि भावाच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ नये. मिठाईप्रमाणे जीवनात नेहमी गोडवा राहावा.

 • Raksha Bandhan 2018 Pooja Plate information

  दिवा - 
  राखी बांधल्यानंतर बहिण दिवा लावून भावाला ओवाळते. यामागे अशी मान्यता आहे की, दिवा लावून ओवाळल्याने सर्वप्रकारच्या वाईट दृष्टीपासून भावाचे रक्षण होते.

Trending