Home | National | Madhya Pradesh | Rakshabandhan Special News

1 कुटुंब, 98 सदस्य, प्रत्येकाच्या हातावर 45 राख्या; अशी साजरी करतात राखीपौर्णिमा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 26, 2018, 11:37 AM IST

या उत्सवात आशीर्वाद लाड कुटुंबातील 98 सदस्य जमा झाले आहेत. एकेकाच्या हातावर 45 राख्या बांधल्या जातात.

 • Rakshabandhan Special News

  खंडवा - सर्वात मोठे आनंदी कुटुंब. गीत-संगीताचा ताल, खळखळून हसणारी मुले, उत्साहाच्या रंगात रंगलेले तरुण आणि सजले-धजलेले महिला-पुरुष. एकीकडे हलवाई पूर्ण टीमसोबत जेवण तयार करण्यात गुंतलेला. मिठाईसहित इतर व्यंजनांचा सुगंध दरवळतोय. हे एखाद्या लग्नाचे दृश्य नाही, तर शहरातील एका कुटुंबाकडून साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण आहे. या उत्सवात आशीर्वाद लाड कुटुंबातील 98 सदस्य जमा झाले आहेत. एकेकाच्या हातावर 45 राख्या बांधल्या जातात. 16 वर्षांपासून सुरू असलेला हा उत्सव 25 ते 26 ऑगस्टपर्यंत नवकारनगरच्या एका मंगलमय परिसरात साजरा केला जाईल.

  आजकाल एकट्या-दुकट्यांची एकाकी कुटुंबे आहेत. त्यातही मोबाइल आणि टेक्नॉलॉजीमुळे आजच्या काळात एकमेकांपासून मने दुरावलेली. धावपळ, व्यग्रता आणि रोजी-रोटीसाठी पांगलेली रक्ताची नाती. या सर्वांमध्ये आशीर्वाद लाड परिवार देश-समाजासाठी एकता आणि स्नेहाचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. कुटुंबातील ज्येष्ठ 70 वर्षीय वासुदेव प्रसाद लाड सांगतात की, वडील स्व. छोगालालजी आणि आई स्व. सीतादेवी यांच्या संस्कारांमुळे हे कुटुंब आजही स्नेहाचे सूत्र आणि प्रेमाच्या बंधनात बंधलेले आहे. आईवडिलांच्या प्रेरणेने हा उत्सव 16 वर्षांपासून साजरा केला जात आहे.

  व्यग्रता केली दूर, सर्वांचा एकत्र उत्सवाचा निर्णय:
  कुटुंबात 7 भाऊ- वासुदेव प्रसाद, नारायण, शांतिलाल, पुरुषोत्तम, विजय, अजय आणि प्रमोद आहेत. 4 बहिणी रुक्मिणी देवी, सुलोचना, अनुसूया आणि सुधाराणी आहेत. नोकरी, व्यवसायाने भावांना दूर केले. लग्नानंतर बहिणी सासरी गेल्या. यामुळे राखीचा उत्सव साजरा करणे बहिणींसाठी सर्वात कठीण बनले. यामुळे सर्वांनीच दरवर्षी हा सण एकत्र साजरा करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला काही वर्षे बरुड येथील वडिलोपार्जित घरात सण केला. मग खंडवाच्या पडावा परिसरातील घरात 13 वर्षांपासून मंगलमय वातावरणात उत्सवासारखा हा सण साजरा केला जात आहे.

  असे आहे कुटुंबाचे गणित:
  7 भाऊ, 4 बहिणी, 7 भावांची 11 मुले, 9 मुली, 9 भाच्या, 7 भाचे; मुलगी, पुतणी, भाच्यांना 22 मुले, भावांनाही 9 मुले.

Trending