आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टारने खरेदी केले कोट्यावधींचे नवीन घर, पहिलेच 100 कोटींच्या बंगल्याचा मालक आहे अॅक्टर, 1300 कोटींची आहे प्रॉपर्टी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. साउथ फिल्मचा सुपरस्टार राम चरण तेजाने नवीन घर खरेदी केले आहे. त्याच्या नव्या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. हे घर हैदराबाद, जुबली हिल्स येथे आहे. राम चरणजवळ पहिलेच 100 कोटींचा बंगला आहे. रिपोर्ट्सनुसार राम चरण जवळपास 1300 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. तो सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. 

 

अॅक्टिंगसोबतच बिझनेसमन आहे हा अॅक्टर 
- राम चरण अॅक्टिंगसोबतच बिझनेसही करतो. त्याच्या इनकमचे मुख्य सोर्स एयर लाइन कंपनी, पोलो रायडिंग क्लब, Obstacle रनिंग सीरीज, डेविल्स सर्किट, कोनिडेला प्रोडक्शन कंपनी, मां टीव्हीमध्ये शेअर्स, अपोलोमध्ये पोलो रायडिंग क्लबचे शेअर आहे. 
- तो ट्रूजेट एयरलाइनचा डायरेक्टर आहे. त्याने 2013 मध्ये याची सुरुवात केली होती. याचे हेडक्वाटर हैदराबाद येथे आहे. ही एयरलाइन साउथसोबतच महाराष्ट्र आणि गोव्यामध्येही सर्व्हिस प्रोव्हाइड करते. 
- सध्या राम चरण ज्या घरात राहतो, त्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. घरात वर्ल्ड क्लास एमेनिटीज आहेत. घराच्या भितींवर महागड्या पेंटिग्स आहेत. 


बॉलिवूडमध्येही केले आहे काम 
राम चरणने आपल्या 12 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये फक्त 11 चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूड फिल्म 'जंजीर' (2013) मध्ये तो दिसला होता. त्याने साउथचे 'चिरुथा' (2007), 'मगधीरा' (2009), 'ऑरेंज' (2010), 'नायक' (2013), 'येवदु' (2014) सोबतच अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एका चित्रपटासाठी 12 ते 15 कोटी फीस घेतो.

 

बिझनेसमनच्या नातीसोबत केले लग्न 
-रामचरणने 14 जून, 2012 ला अपोलो हॉस्पिटलच्या एग्जीक्यूटिव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डीची नात उपासना कमिनेनीसोबत लग्न केले होते. 
- तेजाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर तो एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' चित्रपटात दिसणार आहे. 300 कोटीच्या बजेटमध्ये तयार होत असलेला हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार आहे. 
 


 

बातम्या आणखी आहेत...