आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफझल गुरूची फाशी रोखण्यासाठी मांडली होती बाजू... वादग्रस्त खटल्यांवर असे म्हणायचे जेठमलानी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - हायप्रोफाइल खटल्यांसाठी ओळखल्या जाणारे कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी प्रत्येक खटल्यास एक आव्हान म्हणून स्वीकारत होते. त्यांच्यासाठी वकिलीत व्यवहारिकता सर्वात महत्वाची होती. मग, खटला कुणाचाही असो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असो वा संसदेवर हल्ल्याचा दोषी अफझल गुरू... कुठलीही व्यक्ती आपल्याकडे खटला घेऊन येत असेल तर ती माझी प्रोफेशनल जबाबदारी आहे असे म्हणत ते टीकाकारांचे तोंड बंद करायचे. डॉक्टर देखील आपल्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत नाहीत. मग, त्यांचा रुग्ण कुणीही असो याचा काहीच संबंध नाही असे ते म्हणत होते. राम जेठमलानी यांच्या चर्चित खटल्यांवर एक नजर...

अफजल गुरूची फाशी रोखण्यासाठी
संसदेवर हल्ल्याचा आरोपी अफझल गुरूच्या फाशीसाठी अख्खा देश प्रतीक्षा करत असताना त्याची फाशी रोखण्यासाठी राम जेठमलानींनी प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांच्या या खटल्यावर खूप टीका करण्यात आली. उलट, त्यांनीच सरकारवर आरोप केले की सरकार अफझल गुरूसाठी वकील उपलब्ध करून देत नाही.

आसाराम बापूचा खटला
कथित संत आसाराम बापूला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली. त्यावेळी कोर्टात आसारामची बाजू ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी मांडली होती.

राजीव गांधी, इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याची बाजू मांडली
राम जेठमलानी यांनीच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी सतवंत सिंग आणि केहर सिंग यांची बाजू मांडली होती. या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर राजीव गांधींचे मारेकरी व्ही श्रीहरिहरन उर्फ मुरुगनचा खटला देखील त्यांनी लढला होता.

हवाला प्रकरणात लालकृष्ण अडवाणींचे वकील
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी एकेकाळी हवाला प्रकरणात अडकले होते. त्यावेळी जेठमलानी यांनीच त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

हर्षद मेहताचा खटला
अख्ख्या देशाला हादरवणाऱ्या शेअर बाजार घोटाळ्याचा आरोपी हर्षद मेहताचा खठला देखील राम जेठमलानी यांनी लढला होता.

चारा घोटाळा प्रकरण
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी सापडले आहेत. त्यांची बाजू देखील राम जेठमलानी यांनी मांडली होती.

बेहिशेबी मालमत्ता आणि जयललिता
अम्मा म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडकल्या होत्या. त्यांनी देखील वकील म्हणून राम जेठमलानी यांनाच पहिली पसंती दिली होती. यासोबतच टू-जी प्रकरणात आरोपी कनिमोझी यांची देखील बाजू जेठमलानी यांनी मांडली होती.

खाणकाम घोटाळ्यात येड्डींची बाजू मांडली
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर बेकायदेशीर खाण काम घोटाळ्याचे आरोप लागले होते. त्यावेळी त्यांचे वकील राम जेठमलानी होते.

हाजी मस्तानचा खटला
दाउद इब्राहिमपूर्वी मुंबईतील अंडरवर्ल्डमधील नाव हाजी मस्तानवर तस्करीचे आरोप लागले होते. त्यावेळी जेठमलानी यांनी कोर्टात मस्तानची बाजू मांडली होती.

अमित शहांचा खटला
केंद्रीय गृहमंत्री आणि गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सोहराबुद्दीन बनावट चकमकीचे आरोप लागले होते. त्यांची बाजू कोर्टात जेठमलानी यांनी मांडली होती.

अरुण जेटली मानहानी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटलींनी मानहानीचे आरोप केले होते. त्यावेळी जेटलींच्या विरोधात केजरीवालांची बाजू जेठमलानी यांनी मांडली होती. यानंतर केजरीवालांनी जेटलींची माफी मागितली होती.

बातम्या आणखी आहेत...