आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Jethmalani Passes Away: Ram Jethmalani Funeral, Ram Jethmalani Death Demise; Veteran Lawyer Ram Jethmalani

ज्येष्ठ वकील, कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी अनंतात विलीन, अरविंद केजरीवालांसह अनेक नेत्यांनी दिला अखेरचा निरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून ते गंभीर आजारी होते. जेठमलानी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कायदेमंत्री आणि शहरविकास मंत्री देखील होते. त्यांना एक मुलगा महेश जेठमलानी आणि एक मुलगी रानी जेठमलानी आहेत. महेश सुद्धा एक प्रसिद्ध वकील आहेत.

हायप्रोफाइल, वादग्रस्त खटल्यांसाठी होते प्रसिद्ध
जेठमलानी राष्ट्रीय जनता दल (राजद) कडून बिहारमधून राज्यसभा खासदार होते. त्यांनी राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांसाठी खटला लढवला होता. एवढेच नव्हे, तर संसदेवर हल्ल्याचा दोषी अफझल गुरूची फाशी रोखण्यासाठी त्यांनी खटला लढवला होता. जेठमलानी चारा घोटाळ्यातील आरोपी तसेच राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणात अमित शहा यांचेही वकील होते.

पीएम मोदी, अमितशहा, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच व्यक्त केल्या भावना

बातम्या आणखी आहेत...