आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Kapoor Claims' 90% Of Aspiring Actors Have No Work, End Up There Life Giving Auditions

राम कपूरचा दावा - '90% अॅस्पायरिंग अॅक्टर्सकडे नाही कोणतेही काम, ऑडिशन देण्या देण्यातच संपून जाते आयुष्य 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : तिची आणि चित्रपट अभिनेता राम कपूरचे म्हणणे आहे की, अॅस्पायरिंग अॅक्टर्ससाठी सध्याचा काळ खूप कठीण आहे. यांच्यातील 90 टक्के लोकांकडे कोणतेही काम नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य ऑडिशन देण्या देण्यातच संपून जाते. कपूरनुसार, केवळ दोन टक्के लोकांनाच या करिअरमध्ये यश मिळते.  
 

एकेकाळी माझ्याकडे 6 महिने काम नव्हते : राम कपूर... 
46 वर्षांचा राम कपूर एका मुलाखतीत बोलत होता. जेव्हा त्याला विचारले गेले की, करिअरच्या सुरुवातीला गोष्टी किती स्मूथ होत्या ? त्याने उत्तर दिले, "सुरुवातीचे 5-8 वर्षे मी त्या हजारो लोकांपैकी एक होतो, जे अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन आले होते. एक वेळ अशीही आली होती जेव्हा 6 माझ्याकडे कोणतेही काम नव्हते ना मी आवश्यक तेवढे पैसे कमाऊ शकत होतो. पण मी परिस्थिती बदलली आणि पुढे निघालो." 
 
राम कपूरने सांगितल्याप्रमाणे तो पैशांपेक्षा कमला जास्त महत्व देतो. तो म्हणतो. "जर माझा फोकस केवळ पैशावर असता तर मी टीव्हीवरचा काम करत राहिलो असतो. पण जर मला कमी पैशांमध्ये रंजक काम मिळत असेल तरीही मी आनंदाने करेन."
 

'मी सलमान किंवा शाहरुख नाहीये'
जेव्हा रामला विचारले गेले की, तो चित्रपटात आपली टीव्ही एवढी पॉप्युलॅरीटी मिस करतो का ? तर तो म्हणाला, "मी सलमान खान किंवा शाहरुख खान नाहीये. पण त्या स्थानावर पोहोचलो आहे, जिथे संपूर्ण देशात मला माझ्या नावाने ओळखले जाते. माझे स्वतःचे असे फॅन फॉलोइंग आहे. मग ते टीव्ही असो, चित्रपट असो किंवा वेब किंवा थिएटर काहीही असो. मला वाटते की, पॉप्युलॅरीटी नेहमी एकसारखीच राहते. एवढेच नाही तर कपिल शर्मा, जो आपल्या कॉमेडीसाठी ओळखला जातो. जर तो चित्रपट, डेली सोप किंवा वेबवर काही करत असेल. तरीही तो तोच राहणार. त्यामुळे मी जे काही करेन माझे फॅन्स नेहमी मला राम कपूर म्हणून ओळखतील."
 

राम कपूरचा पॉप्युलर शो आणि चित्रपट... 
राम कपूर टीव्हीवर 'घर एक मंदिर', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसम से', 'बड़े अच्छे लगते हैं' आणि 'कर ले तू भी मोहब्बत' यांसारख्या सीरियल्समध्ये दिसला आहे. तसेच मोठ्या पडद्यावर 'स्टुडंट ऑफ द ईयर', 'मेरे डॅड की मारूती', 'शादी के साइड इफेक्ट्स', 'कैदी बाँड्स' आणि 'लव्हयात्री' यांसारख्या चित्रपटात दिसला आहे. 

बातम्या आणखी आहेत...