आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणाचे आमदार टी. राजासिंह यांचे प्रतिपादन, अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभारणारच...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जोपर्यंत प्रत्येक माता, भगिनी माझ्या मुलाला शिवाजी महाराजांसारखा योद्धा बनवेल, असा संकल्प घेत नाहीत, तोपर्यंत अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न साकार होणार नाही. काही धर्मांध देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पहात आहेत. देशातील अनेक अभिनेते येथे मोठे होवून त्यांना असुरक्षिततेची जाणीव होते. परंतु, गोहत्या, लवजिहादच्या माध्यमातून देशात अल्पसंख्याक नव्हे तर बहुसंख्य हिंदुच धोक्यात आहेत. या समस्यांना आळा घालण्यासाठी भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तसेच अयोध्येत श्री रामांचे मंदिर उभारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे प्रतिपादन भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांनी केले. 


रविवारी शहरातील शिवतीर्थ मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १८५३व्या हिंदू राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. व्यासपिठावर हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे सद‌्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते. कड्याक्याच्या थंडीतही सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. कपाळावर कुंकवाचा टिळा व हातात भगवे झेंडे यामुळे परिसर भगवामय झाला होता. आपल्या भाषणात राजासिंह पुढे म्हणाले, प्रत्येक युवकाने योद्धा बनले पाहिजे. अयोध्येत प्रभु श्री रामांचे मंदिर उभारल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही राजासिंह म्हणाले. सभेची सुरुवात शंख-नादाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. आमदार टी. राजासिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वेद पठण करण्यात आले. क्षिप्रा जुवेकर यांनी समितीच्या कार्याची या वेळी माहिती दिली. 


राम मंदिरासाठी वेळ नाही : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर 
ओरिसा येथील जगन्नाथ मंदिर, उज्जैन येथील महादेवाचे मंदिर व शबरीमाला मंदिरातील अनेक विषयात न्यायालय चिंता व्यक्त करून आदेश देते. मात्र, त्यांना गेल्या आठ वर्षात राम मंदिराच्या याचिका ऐकायला वेळ का नाही, असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला. 


अखंड हिंदु राष्ट्र करण्यासाठी कटिबद्ध व्हा : प्रशांत जुवेकर 
हिंदुंनो तुकड्या तुकड्यांत विभागलेल्या हिंदुस्थानला अखंड हिंदू राष्ट्र करण्यासाठी कटिबद्ध होऊ या. एकीकडे हिंदुस्थानचे तुकडे झाले, तर दुसरीकडे भारतातील अनेक राज्यात हिंदू अल्पसंख्य होण्याच्या मार्गावर आहेत. येत्या संक्रांतीला 'तिळगुळ घ्या! आणि जय हिंदू राष्ट्र बोला' असा संकल्प घ्या, असे आवाहनही जुवेकर यांनी या वेळी केले. 


बुधवारी हिंदू राष्ट्रासाठी बैठक 
हिंदू राष्ट्र स्थापण्याची दिशा ठरवण्यासाठी १६ जानेवारीला पद्मावती मंगल कार्यालयात सायंकाळी ६.३० वाजता बैठक आयोजित केली आहे. त्याला उपस्थिती द्यावी, असे आवाहन या सभेत करण्यात आले. 


२०२३ मध्ये हिंदू राष्ट्राची स्थापना : नंदकुमार जाधव 
हिंदुंनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मंदिरांचा निधी अन्य धर्मियांना वाटप करण्यात येतो. 'अल्पसंख्यांकांना फायदे अन् हिंदूंना कायदे' अशी सद्यस्थिती निर्माण झाली आहे. हिंदुंचे उत्सव, सण आल्यावर ध्वनिक्षेपकांवर बंदी आणली जाते. पुरोगामी, राज्यकर्ते, पोलिस यांनी सनातनची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, तरी वर्ष २०२३मध्ये हिंदू राष्ट्राची स्थापना होणारच, असा विश्वास सनातनचे नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केला. 


कपाळावर कुंकवाचा टिळा व हातात भगवे झेंडे घेऊन सभेत रामभक्तांचा जल्लोष 
सभेत मार्गदर्शन करताना भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह. सोबत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेला उपस्थित असलेले जळगाव शहरासह जिल्ह्यातील हिंदू बांधव. 


 

बातम्या आणखी आहेत...