Home | Jeevan Mantra | Dharm | rama navami 2019 pujan vidhi information in marathi

प्रभू श्रीरामाच्या कृपा प्राप्तीसाठी आज या विधीनुसार करावी पूजा, नेहमी राहाल सुखी

रिलिजन डेस्क | Update - Apr 13, 2019, 12:03 AM IST

चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरी केली जाते श्रीरामनवमी, कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आज अशाप्रकारे प्रभू श्

 • rama navami 2019 pujan vidhi information in marathi

  यावर्षी 13 एप्रिलला शनिवारी श्रीरामनवमी आहे. चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामाचे व्रत आणि विशेष पूजन केले जाते. श्रीरामाची पूजा या विधीनुसार करा...


  पूजन विधी
  राम नवमीला सकाळी उठून घराच्या उत्तरेला एक सुंदर मंडप बनवून मध्यभागी एक वेदी बनवा आणि त्यावर भगवान श्रीराम आणि सीतेचा फोटो स्थापना करा. त्यानंतर गंध, तुप, फूल, धूप, दिप अर्पण करून श्रीराम आणि सीतेची पूजा करा. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करावा...


  मंगलार्थ महीपाल नीराजनमिदं हरे।
  संगृहाण जगन्नाथ रामचंद्र नमोस्तु ते।।
  ऊँ परिकरसहिताय श्रीसीतारामचंद्राय कर्पूरारार्तिक्यं समर्पयामि।


  त्यानंतर ताम्हणात कापूर तसेच तुपाचा दिवा लावून श्रीरामाची आरती करावी. आरती झाल्यानंतर खालील मंत्राचा उच्चार फुल-अक्षता वाहतांन करावा.


  नमो देवाधिदेवाय रघुनाथाय शार्गिणे। चिन्मयानन्तरूपाय सीताया: पतये नम:।। ऊँ परिकरसहिताय श्रीसीतारामचंद्राय पुष्पांजलि समर्पयामि।


  फुल-अक्षता वाहिल्यानंतर प्रदक्षिणा घालतांना या मंत्राचा जप करावा.


  यानि कानि च पापानि ब्रह्महत्यादिकानि च। तानि तानि प्रणशयन्ति प्रदक्षिणपदे पदे।।


  पूजा आरती झाल्यानंतर श्रीरामाला नमस्कार करून कल्याणसाठी प्रार्थना करावी.


  श्रीरामाची आरती वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • rama navami 2019 pujan vidhi information in marathi

  श्रीरामाची आरती
  उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
  लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥
  कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
  देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥
  जय एव जय देव निजबोधा रामा ।
  परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु०॥
  प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
  लंका दहन करुनी अखया मारिला ॥
  मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला ।
  आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥
  निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।
  म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥
  आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।
  आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥
  अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार ।
  अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥
  अयोध्येसी आले दशरथकुमार ।
  नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥
  सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।
  सोहंभावें तया पूजा उपचार ।
  सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
  माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥

 • rama navami 2019 pujan vidhi information in marathi

  श्रीराम स्तुती
  नमामि भक्त वत्सलं । कृपालु शील कोमलं ॥
  भजामि ते पदांबुजं । अकामिनां स्वधामदं ॥
  निकाम श्याम सुंदरं । भवाम्बुनाथ मंदरं ॥
  प्रफुल्ल कंज लोचनं । मदादि दोष मोचनं ॥
  प्रलंब बाहु विक्रमं । प्रभोऽप्रमेय वैभवं ॥
  निषंग चाप सायकं । धरं त्रिलोक नायकं ॥
  दिनेश वंश मंडनं । महेश चाप खंडनं ॥
  मुनींद्र संत रंजनं । सुरारि वृंद भंजनं ॥
  मनोज वैरि वंदितं । अजादि देव सेवितं ॥
  विशुद्ध बोध विग्रहं । समस्त दूषणापहं ॥
  नमामि इंदिरा पतिं । सुखाकरं सतां गतिं ॥
  भजे सशक्ति सानुजं । शची पतिं प्रियानुजं ॥
  त्वदंघ्रि मूल ये नरा: । भजंति हीन मत्सरा ॥
  पतंति नो भवार्णवे । वितर्क वीचि संकुले ॥
  विविक्त वासिन: सदा । भजंति मुक्तये मुदा ॥
  निरस्य इंद्रियादिकं । प्रयांति ते गतिं स्वकं ॥
  तमेकमभ्दुतं प्रभुं । निरीहमीश्वरं विभुं ॥
  जगद्गुरुं च शाश्वतं । तुरीयमेव केवलं ॥
  भजामि भाव वल्लभं । कुयोगिनां सुदुर्लभं ॥
  स्वभक्त कल्प पादपं । समं सुसेव्यमन्वहं ॥
  अनूप रूप भूपतिं । नतोऽहमुर्विजा पतिं ॥
  प्रसीद मे नमामि ते । पदाब्ज भक्ति देहि मे ॥
  पठंति ये स्तवं इदं । नरादरेण ते पदं ॥
  व्रजंति नात्र संशयं । त्वदीय भक्ति संयुता ॥

Trending