आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या वाद: ऐनवेळी खंडपीठातील एका न्यायाधीशाची माघार; तारीख निश्चितीचा निर्णय नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बुधवारी तारीख निश्चितीवर निर्णय दिलेला नाही. या प्रकरणात नियमित सुनावणीसाठीची याचिका अॅड. हरिनाथ राम यांनी नोव्हेंबर महिन्यात दाखल केली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, सुनावणी घेणाऱ्या 5 सदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश यू.यू. ललित यांनी सुनावणीतून माघार घेतली आहे.

 

29 जानेवारीला नवीन खंडपीठ करणार सुनावणी

अलाहाबाद हायकोर्टाच्या सप्टेंबर 2010 च्या निर्णयाविरुद्ध 14 अपील दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावरच ही सुनावणी होत आहे. यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी माजी चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय बेंच घेत होती. 2 ऑक्टोबर रोजी ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना दोन सदस्यीय खंडपीठाचे अध्यक्ष करण्यात आले. या खंडपीठाने 4 जानेवारी रोजी सुनावणीची तारीख 10 जानेवारी अशी निश्चित केली होती. तसेच यासाठी 5 सदस्यीय खंडपीठ सुद्धा नेमण्यात आले. आता या खंडपीठातील न्यायाधीश ललित यांनी माघार घेतली. त्यामुळे, 29 जानेवारी रोजी नवीन बेंच या प्रकरणी तारीखवर सुनावणी करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...