आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Temple Case :  Now Tell The Exact Date For The Construction Of The Temple; Says Saints

मंदिरप्रश्नी मोहन भागवतांचा चार-सहा महिन्यांचा सबुरीचा सल्ला; संतांचा संताप : मंदिर उभारणीसाठी आता निश्चित तारीख सांगा! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज- विहिंपच्या धर्मसंसदेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संगमावर धर्मसंकट निर्माण झाले होते. राममंदिरावरून संतांचा संताप पाहायला मिळाला. संसदेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिराचे निर्माण कार्य निर्णायक टप्प्यावर आल्याचे सांगितले. निवडणुकीचे वातावरण आहे. यादरम्यान ४-६ महिन्यांत काही झाले तर ठिक अन्यथा त्यानंतर काही ना काही घडेल. मंदिर एक ते दोन वर्षात बनेल, असे भागवत यांनी सांगितले. तेव्हा मंदिर लवकर प्रतिक्षेत यावे, अशी अपेक्षा असलेल्या काही संतांनी भागवत यांचे म्हणणे ऐकल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि घोषणाबाजीला सुरूवात केली. आता विहिंप व आरएसएसला त्यासाठी मुदत दिली जाणार नाही, असा पवित्र संतांनी घेतला. हा गोंधळ सुरू होता. तेव्हा व्यासपीठावर भागवत यांच्यासमवेत संत नृत्यगोपाल दासही उपस्थित होते. साधू-संतांनी घोषणाबाजी करतानाच मंदिर प्रत्यक्षात आणण्यासाठी निश्चित तारीख सांगण्याचा आग्रह धरला. एवढेच नव्हे तर राजकीय विधाने करणे बंद करा, अशी घोषणा सुरू असतानाच इतर संतांनीही याच सुरात आपलाही सूर मिसळला. व्यासपीठावरून निश्चित तारीख जाहीर न झाल्यामुळे आणखीनच संतापलेल्या संतांनी मंचाकडे मोर्चा वळवला. त्यांना रोखण्यासाठी विहिंप कार्यकर्ते पुढे सरसावले. त्या दरम्यान कार्यकर्त्यांशी झटापटही झाली. तत्पूर्वी महामंडलेश्वर अखिलेश्वरानंद यांनी प्रस्तावाचे वाचन केले. त्यात मंदिर बांधकामासंबंधी काहीही घोषणा नव्हती. आंदोलनाचे राजकारण व्हायला नको, असे आवाहन त्यांनी केले. मात्र प्रस्तावाचे वाचन करण्यापूर्वी संताप व्यक्त केला. 

 

६ एप्रिलला १ कोटी लोक करणार मंत्राचा जप 
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, आपल्याला गरज पडल्यास धैर्य चालणार नाही, हे निक्षूण सांगावे लागेल. ६ एप्रिल रोजी १ कोटी लोक विजय मंत्राचा जप करतील. भविष्यात एखादा कार्यक्रम घेतल्यास त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. मंदिर उभारणाऱ्यांना निवडून आणले पाहिजे. मंदिर कोण बनवू शकेल, हे देखील पाहिले पाहिजे. हे मंदिर हिंदू राष्ट्राचे वैभवशाली मंदिर असेल. 

 

कोर्टात तारीख पे तारीख : जानेवारीत सुनावणी दोन वेळा टळली 
अयोध्येच्या प्रकरणात सुनावणीसाठी गत वर्षी सर्वोच्च न्यायालयात संविधान पीठाची स्थापना करण्यात आली होती. त्यात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्या. यू.यू. ललित, न्या. एन.व्ही. रमाना यांचा समावेश आहे. ५ न्यायमूर्तींचे हे पीठासमोर १० जानेवारी रोजी सुनावणी अपेक्षित होती. परंतु त्या आधीच यू.यू. ललित यांनी या समितीतून आपले नाव काढून टाकले. त्यानंतर सुनावणी पुढे ढकलावी लागली. पुढे २९ जानेवारीला सुनावणी होणार होती.
 
संतापाची तीन कारणे 
१ मोदी सरकारच्या पाच वर्षांचा कार्यकाळ अंतिम टप्प्यात आहे. सरकारने मंदिर बांधकामाच्या दिशेने काहीही प्रयत्न केले नाही, असे संतांना वाटते. सरकारने साधा अध्यादेशही काढला नाही, असे संतांना वाटते. 
२ संघ व त्यांच्या अनुषंगिक संघटनांकडून आंदोलन करून सरकारवर दबाव वाढवण्याची साधू-संतांना अपेक्षा होती. मात्र संघाने सरकारला सल्ला दिला.ही बाब संतांना पटली नाही. 
३ संतांना कोर्टाकडूनही तत्काळ निर्णयाची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नसल्याने नाराजी.
 
संघाचा डाव : सरकारवर कधी नरम कधी गरम 
१७ जानेवारी : नागपूरमध्ये भागवत यांनी युद्ध नसताना सीमेवर सैनिक शहीद कसे काय होतायत, असे विचारले होते. आपण स्वत:चे काम योग्य प्रकारे करत नाहीत, हे दिसते, असे ते म्हटले होते. 
१८ जानेवारी : भय्याजी जोशी यांनी नाराजी दर्शवताना टीका केली होती. ते म्हणाले होते की ,'अयोध्येत मंदिर २०२५ मध्ये होईल.' 
२ जानेवारी : न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राम मंदिरावर अध्यादेशाच्या संबंधी निर्णयाबाबत मोदींनी 'अयोध्येत केवळ राममंदिर होईल', असे म्हटले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...