आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Vilas Paswan Angry Over Seeing Wax On Apple Making Salad, Action Taken Against Shopkeeper

सॅलेड बनवताना सफरचंदावर मेण बघून राम विलास पासवान झाले नाराज, दुकानदारावर केली कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये भेसळ हाेण्याच्या घटना सामान्य आहेत. ग्राहक या प्रकरणी माेठ्या प्रमाणावर तक्रारीही करतात. काही प्रकरणांबाबत सुनावणी हाेते तर काही प्रकरणे तशीच राहतात. परंतुु भेसळीची बाब जर देशाचे पुरवठा व ग्राहक मंत्री रामविलास पासवान यांच्याशीच निगडित असेल तर अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेणेही स्वाभाविक आहे.

मंत्री पासवान यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बाेलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी घरी रशियन सॅलेड बनवण्यासाठी त्यांनी एक सफरचंद उचलले तर त्यावर मेण पडलेले असल्याचे दिसले. त्यांनी चाकूने सफरचंद खरवडून बघितले तर त्यातून बऱ्याच प्रमाणात मेण निघाले. हे सफरचंद दिल्लीतल्या उच्चभ्रू विभागात असलेल्या खान मार्केटमधून त्यांनी खरेदी केले हाेते. त्याची किंमत प्रतिकिलाे ४२० रुपये हाेती. या प्रकरणी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर खाद्य आणि खाण्यापिण्याच्या संबंधित अनेक संस्थांनी दुकानदाराच्या विराेधात कारवाई केली. विशेष म्हणजे सफरचंद अनेक दिवस ताजे राहण्यासाठी तसेच त्याची चमक कायम राहावी यासाठी ते बाजारात आणण्याअगाेदर त्यावर मेणाचा लेप लावला जाताे. विशेष म्हणजे त्याला सरकारची परवानगी आहे. नियमानुसार मेण लावलेले सफरचंद खाण्यायाेग्य राहण्यासाठी तीन प्रकारचे मेण लावण्याची परवानगी आहे. बीजवॅक्स, कर्नाऊबा वॅक्स आणि शेलॅक वॅक्स असे तीन प्रकार आहेत.  मेणाचा उपयाेग करताना माहिती मेणाच्या प्रकारच्या नावासह लेबलच्या स्वरूपात देणे बंधनकारक आहे.
 

मेणामुळे चमक कायम, सफरचंद खराब हाेत नाही
सफरचंदाचे उत्पादन नेहमी थंड प्रदेशात हाेते. भारतात हे प्रामुख्याने काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हाेते. तेथून देशविदेशात पुरवठा हाेते. त्यामुळे सफरचंद जास्त काळ टिकण्यासाठी तसेच त्याची चमक कायम राहावी यासाठी त्यावर मेणाचे काेटिंग केले जाते. सरकारची परवानगी असलेेल्या मेणाचाच त्यासाठी उपयाेग केला जाताे.

बातम्या आणखी आहेत...