आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर प्रोडक्शन कंपनी चालवतात TVचे राम, वडीलांना वाटत होते मुलाने सरकारी नोकरी करावी, पण काही तरी वेगळे करायचे म्हणून 7 भाऊ-बहिणींना घेऊन मुंबईत आले अरुण गोविल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रामानंतर सागर यांच्या 'रामायण' मध्ये रामाची भूमिका करुन प्रसिध्द झालेले अरुण गोविल यांनी नुकतेच वयाची 61 वर्षे पुर्ण केले. 12 जानेवारी 1960 रोजी मेरठमध्ये जन्मलेल्या अरुण यांनी भारतीय अभिनेत्री श्रीलेखासोबत लग्न केले. दोघांचे 2 मुलं आहेत. मुलगा अमल गोविल आणि मुलगी सोनिका गोविल आहेत. अमनचे लग्न झाले आहे तर सोनिका शिक्षण पुर्ण करुन जॉब करतेय. सोनिका 2016 पासून मुंबईमध्ये 'माइंड शेअर' कंपनीमध्ये प्लानिंग एग्जीक्यूटिव्ह म्हणून जॉब करतेय. यापुर्वी ती  'GroupM', 'Maxus' सारख्या कंपनीमध्ये जॉब करत होती. यासोबतच तिने यापुर्वी पार्ट टाइम असिस्टेंट मीडिया मार्केटिंग मॅनेजरचा जॉबही केला आहे. तिच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर तिने 'University of Westminster' मधून मार्केटिंग कम्युनिकेशनमध्ये आपली पोस्ट ग्रॅज्यूएशन डिग्री पुर्ण केली आहे. सोनिका ट्विटरवर खुप अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या अॅक्टिव्हिटीज येथे शेअर करत असते. 

 

सेट वर आशिर्वाद घेण्यासाठी जात होते लोक 
-अरुण गोविल यांना रामाच्या भुमिकेमुळे फार प्रसिद्धी मिळाली होती. कित्येक वेळा लोक त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी मालिकेच्या सेटवर जात असत. त्यांनीच याचा उलगडा एका इंटरव्यूवमध्ये केला होता. 
-एवढेच नाही तर लोक मालिका सुरु होताच टिव्हीला फुलांचा हार घालत आणि अगरबत्ती धूप लावत. हाथ जोडून बसून मालिका पाहत असत. 
-गोविल यांना रामायणानंतर चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. लोकांना ते रामापेक्षा अन्य भूमिकांमध्ये रुचले नाहीत. याचा परिणाम असा झाला की त्यांचे अभिनयाचे करियरच संपले. 
-ते आता टिव्ही किंवा चित्रपटात देखील दिसत नाहीत, ते प्रोडक्शनचे काम करतात. त्यांनी रामायणात लक्ष्मणाचा रोल करणारे सुनिल लाहिडी यांच्यासोबत एक प्रोडक्शन कंपनी सुरु केली आहे. ही कंपनी दुरदर्शनसाठी कार्यक्रम तयार करते.

 

राम नगरमध्ये झाला जन्म...
टीव्हीवरी राम अर्थातच अभिनेते अरुण गोविल यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1958 रोजी उत्तरप्रदेशातील राम नगर (मेरठ) येथे झाला. मेरठमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी रंगभूमीवर काही नाटकांमधअये अभिनेय केला. अरुण यांनी सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अरुण यांना काहीतरी वेगळे करायचे होते. बिझनेस करायच्या निमित्ताने ते मुंबईत आले खरे, मात्र त्यांनी अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला.


मोठ्या पडद्यावर मिळाली पहिली संधीः 
अरुण यांना खरी प्रसिद्धी छोट्या पडद्याने मिळवून दिली. मात्र त्यांना पहिला ब्रेक 1977 मध्ये ताराचंद बडजात्या यांच्या पहेली या सिनेमात मिळाला. त्यानंतर त्यांनी 'सावन को आने दो' (1979), 'सांच को आंच नहीं' (1979), 'इतनी सी बात' (1981), 'हिम्मतवाला' (1983), दिलवाला' (1986), 'हथकडी' (1995) आणि 'लव कुश' (1997) या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.


छोट्या पडद्यावर रामपूर्वी मिळाली होती विक्रमादित्यची भूमिकाः 
रामानंद सादर यांच्या विक्रम और बेताल या मालिकेत अरुण गोविल यांना राजा विक्रमादित्यची भूमिका मिळाली होती. या मालिकेला मिळालेल्या अफाट लोकप्रियतेनंतर 1987 मध्ये रामानंद सागर यांनी रामायण या मालिकेत त्यांना राम ही प्रमुख भूमिका ऑफर केली. ही भूमिका एवढी गाजली, की आजही लोक त्यांना टीव्हीवरील रामाच्या रुपात ओळखतात. अरुण यांनी 'लव कुश' (1989), 'कैसे कहूं' (2001), 'बुद्धा' (1996), 'अपराजिता', 'वो हुए न हमारे' आणि 'प्यार की कश्ती में' या गाजलेल्या मालिकांमध्येही अभिनय केला आहे.

बातम्या आणखी आहेत...