आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामसृष्टी उद्यानाचे दुर्दैवाचे दशावतार कायम, दुरुस्तीला लागेना मुहूर्त; पर्यटकांसह नागरिकांनी फिरवली पाठ 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : सिंहस्थादरम्यान शहरात येणाऱ्या भाविकांच्या साेयीच्या दृष्टीने तसेच मनाेरंजनासाठी प्रशासनाच्या वतीने लाखाे रुपये खर्चून रामसृष्टी उद्यान साकारण्यात अालेले अाहे. मात्र, या उद्यानाच्या देखभालीकडे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात अाहे. लाखाे रुपये खर्च करून बांधलेल्या उद्यानाला टवाळखाेरांचा अड्डा असे स्वरूप प्राप्त झाले अाहे. याबाबत तक्रारी वाढत असतानाही दुरुस्तीला मुहूर्त लागत नाही. या विषयावर डी. बी. स्टारने टाकलेला प्रकाशझाेत...    देशातील १०० स्मार्ट सिटींमध्ये समावेश झालेल्या नाशिक शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी महापालिका तसेच स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या वतीने काेट्यवधी रुपये खर्चून तपाेवन परिसरात माेठा गाजावाजा करत रामसृष्टी उद्यान साकारण्यात अाले अाहे. या ठिकाणी माेठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या साेयीच्या उद्देशाने हे उद्यान साकारण्यात अालेे हाेते. मात्र, कुंभमेळा पार पडताच या उद्यानाच्या देखभालीकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात अाहे. ठिकठिकाणी पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य, पसरलेली दुर्गंधी, लाखाे रुपये खर्चून साकारलेली इमारतीचे झालेली तुटफूट अशी माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली अाहे. या प्रकारामुळे पर्यटकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली असून टवाळखाेरांचा अड्डा असे स्वरूप प्राप्त झाले अाहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार केले जात असल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये देखील वाढ हाेऊ लागली अाहे. या प्रकारांमुळे लाखाे रुपयांचा खर्च वाया गेल्याची परिस्थिती निर्माण झाली अाहे. शहरात एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात काेट्यवधी रुपये खर्चून विविध उपक्रम, प्रकल्प राबविले जात असतांना दुसरीकडे शहरात साकारण्यात अालेले विविध प्रकल्पाच्या देखभालीकडे मात्र साेइस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात अाहे. विशेष म्हणजे याबाबत लाेकप्रतिनिधींसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतरही याबाबत काेणत्याही ठाेस उपाययाेजना करण्यात न अाल्याने महापालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात अाहे. पर्यटकांच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता तातडीने या उद्यानाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात अाहे.  वाहते सांडपाणी अन‌् कचऱ्याच्या साम्राज्यामुळे पसरली दुर्गंधी    महापुरामुळे उद्यानाची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था  गेल्या अाठवड्यात शहरात झालेल्या संततधार पावसामुळे या उद्यानाची माेठ्या प्रमाणावर वाताहत झाली अाहे. या प्रकारामुळे उद्यानाच्या दुरवस्थेत अधिकच भर पडता अाहे. शहराच्या साैंदर्यीकरणात भर टाकणाऱ्या या उद्यानाच्या देखभालीबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यंानी तातडीने लक्ष देऊन या उद्यानाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात अाहे.    अधिकाऱ्यांनी पाहणी दाैरा करण्याची गरज  स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहराला स्मार्ट करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम, प्रकल्प राबविले जात अाहे. अशी परिस्थिती असतांना दुसरीकडे शहराच्या साैदर्यीकरणात भर टाकणाऱ्या प्रकल्पाची मात्र माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली अाहे.याबाबत तक्रारी वाढत अाहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देवून उपाययाेजना बाबत अादेश देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.    खुल्या नाट्यगृहाचा गैरप्रकारांसाठी हाेताेय वापर  स्थानिक कलावंताच्या साेयीच्या दृष्टीने या रामसृष्टी उद्यानाच्या परिसरात खुले नाट्यगृह साकारण्यात अालेे अाहे. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या खुल्या नाट्यगृहाची माेठ्या प्रमाणावर वाताहत झालेली अाहे. लाखाे रुपये खर्चून साकारलेल्या या उद्यानाचा वापर खुल्या जागेत गैरप्रकारासाठी केला जात अाहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी टवाळखाेर जमत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला अाहे.याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाेलिसांनीही लक्ष देऊन या ठिकाणी जमणाऱ्या टवाळखाेरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात अाहे.    उद्यान विभागाकडून केले जातेय साेयीस्कर दुर्लक्ष  पर्यटक तसेच स्थानिक अधिकाऱ्यांकडून उद्यानाच्या दुरवस्थेबाबत अनेकदा तक्रारी करण्यात अालेल्या अाहेत. मात्र, मनुष्यबळाचे कारण देत उद्यान विभागाकडून दुरुस्तीकडे साेयीस्कर दुर्लक्ष केले जात अाहे. याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता उद्यान विभागाकडून साेयीस्कर दुर्लक्ष केले जात अाहे.    पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करणार  रामसृष्टी उद्यानाच्या दुरावस्थेबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या अाहेत.गेल्या अाठवड्यात गाेदावरीला अालेल्या महापुरामुळे या उद्यानाचे काही प्रमाणात नुकसान झालेले अाहे. याबाबत त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाेबत पाहणी करून तातडीने उद्यानाची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच या ठिकाणी असलेल्या इमारतीचे झालेली तुटफूटची देखील घेण्यात येऊन दुरुस्ती करण्यात येणार आहे. - राजेंद्र पाटील, प्रभारी विभागीय अधिकारी, पंचवटी  तातडीने दुरुस्ती करण्यात यावी    शहराच्या साैदर्यीकरणात भर टाकणाऱ्या रामसृष्टी उद्यानाची दुरवस्था लक्षात घेता तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अन्या महापालिके विराेधात अांदाेलन करण्यात येईल. - कैलाश देशमुख, मठ-मंदिर प्रमुख, विश्व हिंदू परिषद   

बातम्या आणखी आहेत...