श्रीरामचरित्र मानस / आयुष्यात कोणतेही कठीण काम करताना भयमुक्त राहा आणि मन शांत ठेवा

लंकेत गेल्यावर हनुमानाने केला होता मोठा पराक्रम 
 

दिव्य मराठी वेब

Jun 15,2019 02:11:00 PM IST

जीवन मंत्र डेस्क - भगवान श्रीरामचरित्रात पाचवा अध्याय असलेल्या सुंदरकांडमध्ये सुखी आयुष्याचे आणि यशस्वी होण्याचे अनेक सुत्र सांगितले आहेत. यामध्ये हनुमाने सांगितले की यश कसे मिळते. सुंदरकांडानुसार, जेव्हा हनुमान लंकेत गेले तेव्हा रावणाच्या अनेक योद्ध्यांना पराभूत केले होते. पण शेवटी मेघनादने हनुमानाला बंदी बनवले आणि रावणाच्या दरबारात हजर केले. त्यामुळे रावणाने हनुमानाला शिक्षा देण्यासाठी त्यांच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला.


श्रीरामचरित मानसमध्ये हे वर्णन केलेले आहे
जिन्ह कै कीन्हिसि बहुत बड़ाई। देखउं मैं तिन्ह कै प्रभुताई।
जिनकी इसने बहुत बढ़ाई की है, मैं जरा उनकी प्रभुता तो देखूं।


दरबारात रावण आणि हनुमानजी भय आणि निर्भयता अशा स्थितीमध्ये होते. रावण वारंवार फक्त यामुळे हसत होता, कारण त्याला आपला भीती लपवायची होती. रावण म्हणाला की, त्याला या वानराच्या मालकाची ताकद पाहायची आहे. श्रीरामाचे सामर्थ्य बघण्यामागे त्याला आपला मृत्यू दिसत होता. पण हनुमान मात्र निश्चिंत आणि भयमुक्त ऊभे होते. यादरम्यान रावण खूप चिंतेत होता, तर हनुमानजी शांत चित्ताने त्याच्याशी बोलत होते आणि पुढील योजना आखत होते.


त्यामुळे आपण आयुष्यात कोणतेही कठीण काम करत असताना न घाबरता केले पाहिजे आणि मन शांत ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा हनुमानाच्या शेपटीला आग लावण्यात आली तेव्हा त्यांनी पूर्ण लंकाच जाळून टाकली आणि सुरक्षित प्रभु श्रीरामांकडे परतले. तसेच, माता सीता रावणाच्या लंकेत असल्याचे श्रीरामांना सांगितले.

X
COMMENT