spiritual / रामायण : या तीन किस्स्यांच्या मदतीने जाणून घेऊ शकता पती-पत्नीचे नाते कसे असायला हवे 

राम-सीता आणि रावण-मंदोदरी यांच्या नात्यामध्ये होते खूप मोठे अंतर, सीता-राम यांची जोडी यामुळेच आहे आदर्श 

दिव्य मराठी वेब

Aug 18,2019 04:07:23 PM IST

जीवनमंत्र डेस्क : आज बहुतांश लोकांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद आले आहेत. यामुळे पती आणि पत्नी मानसिक तणाव आणि समस्यांचा सामना करतात. अशा परिस्थितीत आयुष्याचे ओझे वाटू लागते आणि नैराश्य येते. या परिस्थितींपासून वाचण्यासाठी पती आणि पत्नी, दोघांनी येथे सांगितल्या जाणाऱ्या तीन गोष्टींची काळजी घ्यावी.

- कठीण प्रसंगात एकमेकांची साथ सोडू नये.
- पती-पत्नीने एकमेकांच्या मनातले समजून घेतले पाहिजे.
- चुकीचे काम करण्यापासून रोखले पाहिजे.

जेव्हा श्रीरामांना मिळाला वनवास तेव्हा देवी सीतेने दली साथ
रामायणात जेव्हा कैकयीने राजा दशरथयांना दोन वरदानांनमध्ये भरतसाठी राज्याभिषेक आणि श्रीराम यांच्यासाठी चौदा वर्षांचा वनवास मागितला आणि दशरथ राजाला या दोन गोष्टी मान्य कराव्या लागल्या. तेव्हा श्रीराम वनवासाला जाण्यासाठी तयार झाले. त्यावेळी लक्ष्मणसोबतच देवी सीतादेखील श्रीराम यांच्यासोबत वनवासाला जाण्यासाठी तयार झाल्या. सीता सुकोमल राजकुमारी होत्या, त्यामुळे सर्वांनी त्यांना वनवासाला न जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. वनात अनवाणी पायांनी चालणे, मोकळ्या वातावरणात तहाने, देवी सीतेसाठी शक्य नव्हते. तरीदेखील देवी सीता आपल्या पतिव्रता धर्माचे पालन करत श्रीराम यांच्या दुःखात साथ देण्यासाठी वनवासात गेल्या. त्या काळात देवी सीतेने आणि प्रभू रामचंद्रांनी अनेक दुःखांचा सामना केला.

आजदेखील पती-पत्नीच्या नात्यामध्ये हे असणे गरजेचे आहे. सुखात तर सर्वच जण साथ देतात मात्र दुःखात पती-पत्नीच्या खऱ्या प्रेमाची आणि समर्पणाची परीक्षा होत असते. या परीक्षेत सफल झाल्यानंतर वैवाहिक आयुष्य सुख आणि आनंदाने भरते.

जेव्हा देवी सीतेने ओळखले श्रीरामांच्या मनातले...
वनवासाला जाताना श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासोबत निषादराजला केवटने आपल्या बोटीतून गंगा नदी पार करून दिली होती. जेव्हा केवटने त्यांना गंगा नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सोडले तेव्हा श्रीराम त्याला भेट म्हणून काही देऊ इच्छित होते. मात्र प्रभू रामचंद्रांकडे त्याला देण्यासाठी काही नव्हते. तेव्हा श्रीराम काहीही न म्हणता सीताने त्यांची मन:स्थिती ओळखली आणि आपल्या बोटातील अंगठी काढून केवटला भेट देण्यासाठी पुढे केली.

या प्रसंगावरून कळते की, पती-पत्नी यांच्यामध्ये असा ताळमेळ असायला हवा की, काहीही ना बोलता त्यांना एकमेकांची इच्छा कळावी. जे दाम्पत्य हे लक्षात ठेवते, त्यांच्या जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखद राहते.

मंदोदरीने रावणाला समजावले होते की, श्रीरामाशी वैर घेऊ नये...
जेव्हा श्रीराम आपल्या वानर सेनेसोबत समुद्र ओलांडून लंकेला पोहोचले होते, तेव्हा मंदोदरी समजली की, लंकापती रावणचा पराजय निश्चित आहे. त्यामुळे मंदोदरीने रावणाला समजावण्याचा खूप पर्यंत केला की, त्याने श्रीरामांसोबत युद्ध करू नये. सीतेला सोडून यावे. श्रीराम स्वतः देवाचा अवतार आहेत. मंदोदरीने अनेकदा रावणाला समजावले. पण रावणाने ऐकले नाही. श्रीरामांसोबत युद्ध केले आणि आपले सर्व पुत्र आणि भाऊ कुंभकर्णासोबत मृत्युमुखी पडला.

पती-पत्नीच्या आयुष्यात हेदेखील महत्वाचे आहे की, एकमेकांना चुकीचे काम रोखावे. चुकीच्या कामाचा परिणाम चुकीचाच होतो. एकमेकांना योग्य सल्ला दिला पाहिजे. सोबतच दोघांनी एकमेकांचा सल्ला मानला देखील पाहिजे. पती-पत्नीच एकमेकांचे श्रेष्ठ सल्लागार असतात.

X
COMMENT