आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ शनिच नाही तर शिवलिंग आणि श्रीगणेशालाशी अर्पण करू शकता शमीचे पाने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण 9 ग्रह सांगण्यात आले असून यामध्ये शनी न्यायाधीश आहे. कुंडलीमध्ये शनीच्या स्थितीच्या आपल्यावर थेट प्रभाव पडतो. हा ग्रह एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही आणि घरामध्ये अडचणी चालू राहतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनिदोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्याने लाभ होऊ शकतो. येथे जाणून घ्या, शमीचे काही खास उपाय...


# प्रभू श्रीरामांनी केले होते शमी वृक्षाचे पूजन 
पं. शर्मा यांच्यानुसार शमी वृक्षाला पूजनीय मानले जाते. याच कारणामुळे लंका विजयानंतर श्रीरामांनी या झाडाची पूजा केली होती. आणखी एका मान्यतेनुसार, महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासामध्ये शमीच्या झाडावर आपले अस्त्र-शस्त्र लपवले होते. या कारणामुळे शमीचे जास्त महत्त्व आहे.


# घरामध्ये लावू शकता शमीचे झाड
घरच्या उत्तर-पूर्व दिशेला शमीचे झाड लावावे. कोणत्याही शुभ दिवशी हे झाड घरामध्ये लावावे आणि नियमितपणे पूजा करावी. या उपायाने शनिदोषातून मुक्ती मिळते.


# शनिदेवाला अर्पण करावेत शमीची पाने 
तुम्हाला शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी दूर करतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्रीगणेश आणि महादेवाला शमीचे पान अर्पण केल्याने होणारे फायदे...

बातम्या आणखी आहेत...