आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ramcharan's Wife Upasana Upset Over Ignoring South Cinema Artist, Note Written For PM Modi

दाक्षिणात्य कलाकारांना दुर्लक्षित केल्यामुळे रामचरणची पत्नी उपासना नाराज, इंस्टाग्रामवर पंतप्रधानांसाठी लिहीली नोट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ‘150 ईअर्स ऑफ सेलिब्रेटिंग द महात्मा’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडच्या दिग्गजांच्या भेटीमुळे साउथ सिनेमातील अभिनेता रामचरणची पत्नी उपासना खूप नाराज झाली आहे. तिने इंस्टाग्रामद्वारे नाराजी व्यक्त करत दाक्षिणात्य सिनेमाला दुर्लक्षित केल्याचे बोलून दाखवले. तीने शाहरुख खान आणि आमिर खानसोबत पंतप्रधानांचा सेल्फी शेअर करून म्हणाली की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला नेहमीच दुर्लक्षित केलं जातं. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम "चेंज विदिन" मध्ये  मोदी चित्रपट कलाकारांसोबत सामील झाले होते. तिथे त्यांनी कलाकारांना गांधी आणि गांधीवादावर चित्रपट बनवण्याची अपील केली.  

उपासनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नोटमध्ये लिहिले की, "प्रिय नरेंद्र मोदी जी, भारताच्या दक्षिणेमध्ये आम्हा सर्वांना तुम्ही खूप आवडता आणि आम्हाला गर्व आहे की, तुम्ही आमचे पंतप्रधान आहात. पण, आम्हाला वाटते की, संस्कृतीचे नेतृत्व केवळ हिंदी कलाकारां पर्यंतच मर्यादित आहे आणि दाक्षिणात्य सिनेमा दुर्लक्षित केला जोत आहे. मी आशा करते की, हे योग्य भावनेने घेतले जाईल."