आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मदेवांनी रावण आणि विभीषणाला दिले मनासारखे वरदान परंतु कुंभकर्णाला पाहून झाले चिंतीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामायणामसूर रावणाचे दोन भाऊ होते विभीषण आणि कुंभकर्ण. ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी या तीन भावांनी कठोर तपश्चर्या केली होती. त्यानंतर ब्रह्मदेव प्रकट झाले परंतु कुंभकर्णाला वरदान देण्यापूर्वी ते चिंतित होते.


याबाबत श्रीरामचरित मानसमध्ये लिहिले आहे की-
पुनि प्रभु कुंभकरन पहिं गयऊ। तेहि बिलोकि मन बिसमय भयऊ।।

याचा अर्थ असा होतो, की रावणाला वरदान दिल्यानंतर ब्रह्मदेव कुंभकर्णाजवळ गेले. पण त्याला वरदान देण्यावरुन चिंतीत होते. त्याचा देह बघून आश्चर्यचकित झाले होते.


जौं एहिं खल नित करब अहारू। होइहि सब उजारि संसारू।।
सारद प्रेरि तासु मति फेरी। मागेसि नीद मास षट केरी।।


कुंभकर्णाला भोजनासाठी अनेक पदार्थ लागायचे. दररोज जर तो खूप खात राहिला तर सृष्टी नष्ट होऊ शकते, असे ब्रह्मदेवानं वाटले. ब्रह्मदेवांनी देवी सरस्वतीचे आवाहन करून त्याची बुद्धी भ्रमित केली. त्यामुळे त्याने सहा महिने झोपण्याचे वरदान मागितले. ब्रह्मदेव लगेच तथास्तू म्हणाले.


कुंभकर्णविषयी श्रीरामचरितमानसमध्ये लिहिण्यात आले आहे की -
अतिबल कुंभकरन अस भ्राता। जेहि कहुँ नहिं प्रतिभट जग जाता।।
करइ पान सोवइ षट मासा। जागत होइ तिहुँ पुर त्रासा।।


रावणाचा भाऊ कुंभकर्ण अतिशय बलवान होता. त्याच्याशी लढू शकेल असा योद्धा संपूर्ण विश्वात नव्हता. मदिरा प्राशन करुन तो सहा महिने झोपायचा. तो जेव्हा उठायचा तिन्ही लोकांत हाहाकार माजवायचा.
 

जौ दिन प्रति अहार कर सोई। बिस्व बेगि सब चौपट होई।।
कुंभकर्ण जर दररोज जेवला असता तर संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती. त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्याची बुद्धी भ्रमित केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...