आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने आडमुठेपणाची भूमिका सोडून उपमुख्यमंत्री पद घ्यावे, भविष्यात उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून चालतील!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात सत्ता स्थापनेसाठी होणाऱ्या विलंबावर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नवीन फॉर्म्युला मांडला आहे. शिवसेनेने सीएम पदासाठी हट्ट सोडावा आणि लवकरात-लवकर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करावा. राज्यात सत्ता स्थापनेला शिवसेनेमुळेच उशीर होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच, शिवसेनेला उप-मुख्यमंत्री पद आणि भाजपला मुख्यमंत्री पद हीच खऱ्या अर्थाने फिफ्टी-फिफ्टी आहे असे आठवले यांनी एका खासगी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.

भविष्यात उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून चालतील -आठवले

आठवले यांच्या मते, महाराष्ट्रात एकूणच 43 मंत्रिपदे आहेत. त्या प्रत्येक मंत्रिपदाची वाटणी कशी करावी हा फॉर्म्युला आठवेंनी मांडला आहे. त्यानुसार, 43 पैकी 4 मंत्रिपदे रिपाइंसह घटकपक्षांना मिळावीत. उर्वरीत 39 मंत्रिपदांपैकी भाजप आणि शिवसेनेने 20 आणि 19 खाते वाटून घ्यावेत. त्यातही भाजपने शिवसेनेला 16 मंत्रिपदांची ऑफर यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे, शिवसेनेने आडमुठी भूमिका सोडून उप-मुख्यमंत्री पद घ्यावे. भविष्यात उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री म्हणून चालतील असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...