आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण - रामदास आठवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात बुधवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सरकारस्थापनेकडे सकारात्मक पाऊल पडल असल्याचे दोन्ही पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव चर्चेत आहे. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव पुढे असल्याची माहिती आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे आधी माहीत असते तर भाजपने पाठिंबा दिला असता असा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे. 

रामदास आठवले म्हणाले की, "महायुतीचे सरकार यावे यासाठी मी प्रयत्न केले. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहिली. मात्र भाजप ऐकत नाही हे पाहून त्यांना सत्तेबाहेर ठेवायचे हे शिवसेने ठरवले. जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे आधी समोर आले असते, तर भाजपने पाठिंबा दिला असता"
आठवले पुढे म्हणाले की, "शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांच्या तत्वाविरोधात आघाडी केली आहे. ही अनैसर्गिक आघाडी आहे. ती किती दिवस टिकेल माहीत नाही. बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेना राजकारण करत आहे. बाळासाहेबांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न कधीच पूर्ण झाले आहे. काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही असे वाटले होते, पण आता त्यांनी पाठिंबा दिला आहे.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा. त्यांनी जनतेची कामे करावी. तसेच आघाडीत मंत्रिपदावरुन वाद होतील, असा दावा देखील आठवलेंनी केला."
 

बातम्या आणखी आहेत...