आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएमपद प्रत्येकी अडीच वर्षे घ्या अन‌् वाद मिटवा, शिवसेना-भाजपला आठवलेंचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -"शिवसेना आणि भाजप यांनी मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे; पण परस्परांतील वाद संपवून आगामी निवडणुकीसाठी युती करावी,' असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी दिला. 'आपण स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवणार अाहाेत. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, मात्र युती झाल्यास शिवसेना ही जागा माझ्यासाठी सोडेल,' असा विश्वासही अाठवलेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 


भाजपचे ४० आमदार आणि सहा खासदार डेंजर झोनमध्ये असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता आठवले म्हणाले, "त्या डेंजर झोनमधील मतदारसंघ सुरक्षित करण्याची जबाबदारी माझी असेल. बाळासाहेब आंबेडकर आणि एमआयएम यांच्या युतीची भीती नाही. कारण यांच्यापेक्षा माझ्या सभांना जास्त गर्दी होते. आंबेडकरांना टाळी देण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद येत नाही.' 

 

"गावात मराठ्यांचे दोन गट असतात. त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मात्र दलितांनी दुसऱ्यांचे ऐकून असे गुन्हे दाखल करू नयेत. मराठा मोर्चांची चर्चा जगभर झाली. मात्र आता ते आंदोलन हिंसक होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत," असे आठवले यांनी नमूद केले. 

 

...तर नाना, अकबर यांच्यावर कारवाई करा 
"देशभरात 'मी टू'च्या माध्यमातून अनेक व्यक्तींवर आरोप होत आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्या वेळी या घटना घडल्या त्याच वेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर, मंत्री एम. जे. अकबर व इतर लोक खरेच दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी," असे रामदास आठवले म्हणाले. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझा संबंध 'मी टू'शी नव्हे तर यूट्यूबशी असल्याचे आठवले यांनी नेहमीच्या शैलीत सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...