आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवलेंची नाराजी अखेर दूर; राज्यसभेच्या आश्वासनामुळे भाजपच्या राहुल शेवाळेंना देणार साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचा वाद अखेर मिटला आहे. या जागेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे दोघेही आग्रही होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे आठवलेंनी अखेर माघार घेतल्याची माहिती आठवले यांनी दिली.

 

दक्षिण मध्य मुंबईतून त्यांनी यापूर्वी निवडणूक जिंकली आहे, त्यामुळेच त्यांना ही जागा मिळावी अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांना यावेळी संधी त्यांना दिली नाही. जागा न मिळ्यामुळे नाराज आठवलेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि राज्यसभेची जागा आणि मंत्रीपद या तोडपाणीवर माघार घेतली. शिवाय शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे माझे मित्र आहेत, त्यामुळे मी व माझे कार्यकर्ते त्यांना प्रचारात मदत करून निवडून आणणार असल्याचे आठवले म्हणाले.