Home | Business | Business Special | Ramdev Patanjali Slides On Sales After Series Of Missteps Says Report

पतंजलीच्या विक्रीत 10 टक्क्यांनी घट, खराब गुणवत्तेचा रामदेवबाबाला फटका

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 06:37 PM IST

न्यूज एजंसी रॉयटर्सच्या अहवालानुसार, चुकीच्या निर्णयामुळे घटली विक्री

 • Ramdev Patanjali Slides On Sales After Series Of Missteps Says Report

  नवी दिल्ली- पतंजलिचे संस्थापक रामदेव बाबा यांनी 2017 मध्ये असा अंदाज व्यक्त केला होता की, मार्च 2018 पर्यंत कंपनीची विक्री दुप्पट होऊन 20 हजार कोटींचा नफा होईल. पण पतंजलीच्या विक्रीत वाढ होण्याऐवजी 10 टक्के घट होऊन 8,100 कोटी रूपये झाली आहे. न्यूज एजेंसीनुसार, पतंजलीच्या वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती समोर आली आहे.

  पतंजलीने गुवत्तेकडे केले दुर्लक्ष: सुत्र
  रॉयटर्सच्या सुत्र आणि विश्लेषकांनुसार, मागील आर्थिक वर्षी 2018-19 मध्ये पतंजलीच्या विक्रीत वाढ झाली असती, पण गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना हा फटका बसला. केअर रेटिंग्सच्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2018 च्या तीन त्रैमासिकात पतंजलीद्वारे फक्त 4, 700 कोटी रूपयांचे उत्पादन विक्री करण्यात आले.

  या अहवालानुसार, पतंजलीचे विद्यमान आणि पूर्व कर्मचारी, सप्लायर्स, डिस्ट्रीब्यूटर्स, स्टोर मॅनेजर आणि ग्राहकांनी सांगितले की, चुकीच्या निर्णयामुळे कंपनीच्या महत्वकांक्षेला तडा बसला. तसेच, आपल्या उत्पादनाचा वेगाने विस्तार करण्याच्या महत्वकांक्षेमुळे पतंजलीला गुणवत्ता टिकवता आली नाही.

  एका पूर्व कर्मचाऱ्यानुसार, ट्रांसपोर्टबरोबर दिर्घकालीन व्यवहार नसल्यामुळे पतंजलीची योजना रखडली आणि खर्च वाढला. तसेच, पतंजलीकडे, विक्रीवर लक्ष ठेवणाऱ्या सॉफ्टवेअरची कमतरता असल्यामुळे हा परिणाम झाला आहे.

  या सर्व प्रकरणावर पतंजलीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. पतंजलीनुसार, उत्पादनाचा वेगाने विस्तार झाल्यामुळे सुरूवातील काही अडचणी आल्या. पण आता सर्व काही ठिक आहे. पतंजलीचे 98.55 टक्के शेअर असणारे बालकृष्ण यांनी सांगितले की, आम्ही अचानक विस्ताराला सुरूवात केली आणि त्यासोबतच तीन ते चार नवीन युनिटची सुरूवात केली. त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण आता या सर्व गोष्टींचे निदान झाले असून पतंजली पूर्ववत होण्यास तयार आहे.

Trending