आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमेशजींच्या 74 व्या जन्मदिनी दोनदिवसीय प्रेरणा उत्सव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या ७४ व्या जन्मदिनी दोन दिवसीय प्रेरणा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.२९ नोव्हेंबर : या दोनदिवसीय उत्सवाचे पहिले सत्र २९ नोव्हेंबरला होईल. या दिवशी २ कार्यक्रम आहेत. यातील पहिला कार्यक्रम श्रद्धांजलीचा व नंतर विशेष मुलाखत होईल. यात पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा प्रमुख पाहुणे असतील. सूत्रसंचालन सिद्धार्थ जरेबी हे करतील. याच दिवशी दुसरा कार्यक्रम असेल ‘अल्फाज और सुरों का जादू’ यात पीयूष मिश्रा हे प्रमुख आकर्षण असतील.
३० नोव्हेंबर : दुसऱ्या दिवशी ३० नोव्हेंबरला भोपाळ येथील रवींद्र भवनच्या मुक्ताकाश मंचावर सायंकाळी ६.३० वाजता ‘कविताओं की शाम’चे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रसिद्ध कवींच्या काव्यवाचनामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरेल. 


रमेशजींचा जन्मदिन 30 नोव्हेंबर  हा प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे ‘भास्कर’ परिवाराने ठरवले आहे. या प्रेरणादिनी समूहात विविध कार्यक्रम आयोजित होतील. रक्तदान : संस्थेच्या वतीने देशभर १८० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाईल.


वस्त्रदान : ११ राज्यांत २१ ते २७ नोव्हेंबरपर्यंत वस्त्रदान अभियान आयोजित केले होते. यात आलेली वस्त्रे समूहाच्या वतीने अनाथालय आणि वृद्धाश्रमांत वाटली जातील.


प्रेरणा पुरस्कार : संस्थेतील सहकाऱ्यांसाठी रमेशजींनी जोपासलेल्या मूल्यांवर आधारित प्रेरणा पुरस्कार जाहीर केला जाणार आहे. सामाजिक हित जपताना असलेला साधेपणा, मानवतावाद, जनसंपर्क आणि व्यवसायातील वाढीमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. 


चित्रकला स्पर्धा : संस्थेतील सहकाऱ्यांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाईल. मुलांनी तयार केलेली ही चित्रे कार्डच्या स्वरूपात विविध प्रसंगी वापरली जातील. यातील निवडक चित्रे कार्यालयांतही लावली जातील. 

बातम्या आणखी आहेत...