Home | Sports | Other Sports | ramgopal kalani record in swiming

३० तास पोहण्याचा ४७ व्या वर्षी विक्रम

Agency | Update - May 30, 2011, 06:18 PM IST

47 वर्षीय डॉ. रामगोपाल कालानी या जलतरणपटूंनी सलग 30 तास पोहण्याचा नवा विक्रम नोंदवला.

 • ramgopal kalani record in swiming

  परभणी - 47 वर्षीय डॉ. रामगोपाल कालानी या जलतरणपटूंनी सलग 30 तास पोहण्याचा नवा विक्रम नोंदवला. नवतरुण जलतरणपटूंनाही लाजवेल अशा या विक्रमी 30 तासांमध्ये 722 फेर्‍या मारणार्‍या डॉ. कालानी यांच्या या विक्रमाची लवकरच ‘लिम्का बुक’मध्ये नोंद होणार आहे. शहरातील कै. पंजाबराव देशमुख जलतरणिकेत डॉ. कालानी यांनी या विक्रमी पोहण्याची नोंद केली.

  30 तासांमध्ये 722 फेर्‍या
  30 तास सलग पोहण्याचा विक्रम करणार्‍या डॉ. कालानी यांनी 722 फेर्‍या मारल्या. शनिवारी सकाळी 10 वाजेपासून त्यांनी पोहण्यास सुरुवात केली. 10 ते 12 या वेळेत त्यांनी सुरुवातीला 79 फेर्‍या पूर्ण केल्या. त्यानंतर सलग 30 तासांत त्यांनी 722 फेर्‍या पूर्ण केल्या.

  प्रतितास 1 किमीचा वेग
  30 तास सलग पोहण्याच्या नव्या विक्रमाची नोंद करणार्‍या डॉ. कालानी यांनी प्रतितास 1 किमीच्या वेगाने ही कामगिरी केली आहे. 30 तासांत त्यांनी 30 किमी 324 मीटर अंतर कापले.

Trending