आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ramkishan Yadav, In Shahpur Shares Party Of Mangoes And Free Of Cost To The People

आजोबाला दिलेले वजन पूर्ण करण्यासाठी मोफत वाटत आहे आंबे, दरवर्षी देतात मॅंगो पार्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहपूर(मध्यप्रदेश)- अनेक शेतकरी आपल्या शेतात आंब्याची झाडे व्यवसाय करण्यासाठी लावतात. पण चुडीया गावचे माजी सरपंच रामकिशन यादव आपल्या शेतातील सर्व आंबे लोकांना मोफत वाटतात. आपल्या आजोबाला दिलेल्या वचनामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दरवर्षी सर्वांसाठी ते एका कार्यक्रमाचे आयोजन करतात. बुधवारी देण्यात आलेल्या या आंबा पार्टीत नेतेमंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांसोबत बसून वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांचा आस्वाद घेतला. रामकिशन ही पार्टी सहा वर्षांपासून देत आहेत. 


3 एकरमध्ये 150 आंब्याची झाडे 
रामकिशन यादव यांच्या 3 एकर बागेत लंगड़ा, दशहरी, चौसा, गाजरिया, केसर, बादाम आणि बांबे ग्रीन यासारख्या आंब्याच्या जाती आहेत. रामकिशन कधीच हे अंबे विकत नाहीत. कारण त्यांचे आजोबा औझीलाल यांनी सांगितले होते की, आंब्यासाठी कोणालाही नकार देऊ नये. त्यामुळे त्यांच्या या आज्ञेचे पालन आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले. या आंबा पार्टीच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटी-गाठी होतात. तसेच, त्यांचा मुलगा योगेशने सांगितले की, तोसुद्धा ही प्रथा पुढे अशीच सुरू ठेवणार आहे.