आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

डी-मार्टचे मालक दमाणी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत, संपत्ती १६.४ कोटींवरून १.२७ लाख कोटींवर

7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ३ दिवसांपूर्वी अदानी, नाडर, कोटकनंतर ते होतेे ५ व्या स्थानी
  • १ हजार कोटी रुपयांची संपत्ती ३ दिवसांत वाढली

मुंबई - डी-मार्टची पॅरेंट कंपनी अॅव्हेन्यू सुपर मार्केटचे मालक राधाकृष्ण दमाणी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्जच्या रिअल टाइम नेटवर्थ यादीनुसार, शुक्रवारी दमाणींची संपत्ती १.२७ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. बुधवारी दमाणी ५ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. कंपनीत दमाणी कुटुंबीयांचे ८०% शेअर्स आहेत. ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी शेअर होल्डिंग घटवून ७७.२७ करण्याची घोषणा केली. कंपनीत ३ वर्षांंपूर्वी १ लाख गुंतवणूक, आता मूल्य ८.३१ लाख

शेअर बाजारात अॅव्हेन्यू सुपरमार्केटची लिस्टिंग २१ मार्च २०१७ रोजी झाली. तेव्हा कंपनीचे एकूण भांडवल ३९ हजार कोटी रु. इतके होते. तेव्हा कंपनीत १ लाखांची गुंतवणूक केली असताना लाभांश व इतर फायदे मिळून गुंतवणुकीची रक्कम आता ८.३१ लाख रुपये होते. इन्व्हेस्टमेंट गुरू राकेश झुनझुनवालांचे मेंटर दमाणींनी २००२ मध्ये उघडले पहिले स्टोअर


माध्यमांपासून दूर राहणारे ६५ वर्षीय दमाणी २००२ मध्ये रिटेल बिझनेसमध्ये उतरले. त्यांनी मुंबईत पहिले स्टोअर सुरू केले. आता कंपनीचे २०० स्टोअर आहेत. १.५ लाख कोटी रुपये मार्केट कॅप आहे. रिटेल बाजारात उतरण्यापूर्वी दमाणींची ओळख शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार अशी होती. 

ती आजही कायम आहे. परंतु सुरुवातीपासून ते स्वत:ला खूप लो प्रोफाइल ठेवत आले आहेत. भारतातील सध्याचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे मेंटरसुद्धा दमाणी हेच आहेत. ते वेगवेगळ्या सेक्टरमधील कंपन्यांत मोठे भागधारक आहेत. यात इंडिया सिमेंट, व्हीएसटी इंडस्ट्रीज, ब्ल्यू डार्ट, सिनेप्लेक्स कंपन्या व काही तंबाखू कंपन्यांचाही समावेश आहे. त्यांचे वडील स्टॉकब्रोकर होते. यामुळे लहानपणापासून शेअर बाजारातील बारकावे त्यांनी शिकण्यास सुरुवात केली. अनेक दशके शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर अॅव्हेन्यू सुपरमार्केट आणले. २०१७ मध्ये कंपनीच्या लिस्टिंगदरम्यान त्यांची संपत्ती १६.४ हजार कोटी रुपये इतकी होती. संपत्तीच्या स्पर्धेत अंबानी खूप पुढे...
पहिले : मुकेश अंबानी - 4.13 लाख कोटी रुपये


दुसरे : राधाकृष्ण दमाणी -  1.27 लाख कोटी रुपये


तिसरे : गौतम अदानी - 1.11 लाख कोटी रु.


चौथे : उदय कोटक - 1.06 लाख कोटी रु.


पाचवे : शिव नाडर - 1.04 लाख कोटी रु.
 0