आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परमहंस यांनी शिष्याला सांगितले, स्त्रीसाठी पुरुष का होतात विचलित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस कालिका देवीचे परम भक्त होते. विवाहित असूनही आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांच्या पत्नी शारदा माहेरीच राहत होत्या. काहीकाळ त्यांनी पतीकडूनच संन्यास दीक्षा घेतली आणि त्याही आजीवन ब्रह्मचारिणी राहिल्या. यांच्या जीवनातील विविध प्रसंगांमध्ये सुखी जीवनाचे सूत्र दडलेले आहेत. येथे जाणून घ्या, असाच एक प्रसंग, ज्यामध्ये स्वामींनी वाईट विचारांचे रहस्य समजून सांगितले आहे.


एकदा रामकृष्ण परमहंस यांच्या शिष्याने विचारले की, स्वामीजी या सृष्टीवरील पुरुष स्त्रियांच्या देहासाठी एवढे पतित(वाईट विचार) का होत चालले आहेत? महिलांविषयी मनात एवढे वाईट विचार का ठेवतात?


> स्वामीजी हसत-हसत शिष्याला म्हणाले की, हाच तर पुरुषांच्या बुद्धीचा भ्रम आहे. सर्व पुरुष स्त्रीच्या बाहेरील देहाकडे पाहतात. शरीराचे बाहेरील सौंदर्य पाहून विचलित होतात. हे मनुष्य जीवनाच्या सत्यापासून दूर आहेत.


> शिष्याने विचारले कोणते सत्य स्वामीजी?


> स्वामीजी म्हणाले विचार कर- स्त्रीचा देह फक्त हाड-मांस, चरबी, मल-मूत्र असाच आहे. पुरुषाने स्त्रीकडे याच सत्याने पाहिले तिच्याकडे आकर्षित होणार नाही. स्त्रियांविषयी पुरुषाच्या मनात विरक्तीची भावना उत्पन्न होईल.


> अशाचप्रकारे सृष्टीवर सर्व गोष्टींवर हाच नियम लागू होतो. मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा मोह राहतो कारण तो बाह्यसौंदर्य पाहतो. सत्य तर हे आहे की, सर्व गोष्टी नश्वर आहेत. काहीकाळाने सर्वकाही नष्ट होणारच आहे.


> या प्रसंगावरून हीच शिकवण मिळते की, बाह्यसौंदर्य कधीही पाहू नये. मनाच्या आतील सत्य समजून घ्यावे. बाह्य स्वरूप जेवढे आकर्षक असेल तेवढेच आंतरिक स्वरूप आकर्षक असेलच असे नाही.

बातम्या आणखी आहेत...