आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक वारसा जोपासणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विश्वकल्याणाचा ध्यास घेतलेले शतकानुशतकांच्या ज्ञानपरंपरेचे भारत हे जागतिक ज्ञान केंद्र आहे, तक्षशिला ते नालंदा असा आपला शैक्षणिक परंपरेचा वारसा आहे. हा वारसा जोपासण्याचे उत्तरदायित्व विद्यार्थ्यांचे आहे. त्यांनी बौद्धिक संपदेचा वापर देशाची उभारणी व विकासासाठी करावा, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. 

 

लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा १५ वा पदवीदान समारंभ राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, लेह-लडाखचे शिक्षणतज्ज्ञ तथा शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचूक उपस्थित होते. या वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. सोनम वांगचूक यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. 'देशातील नावीन्यपूर्ण कल्पना, बुद्धिमत्ता यांची बीजे इथून अंकुरतात आणि नंतर ती सर्वत्र पसरतात,' अशा शब्दांत गौरव करत राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात पुण्याचा उल्लेख केला. 

 

बातम्या आणखी आहेत...