आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच महिला, एका मुलाच्या मृत्यूप्रकरणी रामपाल, मुलगा वीरेंद्रसह २६ जण दाेषी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार- हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बरवला येथील सतलोक आश्रमात ५ महिला आणि एका मुलाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी आश्रमाचा संचालक व स्वयंघोषित संत रामपाल आणि त्याच्या मुलासह २९ अनुयायांना दोषी ठरवले आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये आश्रमातील हिंसाचारात त्यांचा मृत्यू झाला होता.


हिसारच्या सेंट्रल जेल क्रमांक एकमध्ये खास व्यवस्था करून सुरू करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात खटला क्रमांक ४२९ ची सुनावणी झाली. त्यात ४ महिला आणि एका मुलाच्या मृत्यू प्रकरणात रामपालसह १५ आरोपी आणि खटला क्र. ४३० मध्ये एका महिलेच्या मृत्यूबद्दल रामपालसह १४ आरोपींना दोषी ठरवले. अाता १६ आणि १७ आॅक्टोबरला त्यांना शिक्षा ठाेठावण्यात येईल. नोव्हेंबर २०१४ मध्ये हिसार जिल्ह्यातील बरवाला येथे सतलोक आश्रमावर पोलिसांनी छापा मारला होता. तेव्हा रामपालने आपल्या अनुयायांची ढाल करून हिंसाचार घडवून अाणला हाेता.


हत्येचे २ गुन्हे होते दाखल
पोलिसांनी पाच महिला आणि एका मुलाच्या मृत्यूप्रकरणी रामपाल आणि त्याच्या समर्थकांवर हत्येचे दोन गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने या प्रकरणी एकूण २३ जणांना दोषी ठरवले होते. रामपालसह सहा आराेपी दोन्ही खटल्यांत दोषी ठरवण्यात आले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...