आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maha Election; 'पक्षात येण्यासाठी रोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवत आहेत', रणजित नाईक निंबाळकरांचा रामराजे निंबाळकरांवर खोचक टोला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर भाजपमध्ये येण्यासाठी दररोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवत आहेत, असे म्हणत खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी रामराजेंची खिल्ली उडवली. रामराजेंनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला न गेल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे, त्यावरच भाष्य करताना रणजित निंबाळकर असा टोला लगावला.

रणजित नाईक निंबाळकर म्हणाले, "रामराजे भाजपमध्ये येण्यासाठी रोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवत असल्याचे मी ऐकले आहे. मी नीरा देवभर धरणाचे पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवारांचंही काही चालत नाही हे अनेकांच्या लक्षात आल्याने पक्षातील अनेकजण भाजपमध्ये येत आहेत." तसेच त्यांनी खासदार उदयनराजे माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी लवकरच भाजपमध्ये यावे असेही यावेळी रणजित निंबाळकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...